अॅक्वाजेनिक आजाराने ग्रस्त
अमेरिकेत राहणारी १२ वर्षीय डॅनियल हिला अॅक्वाजेनिक अर्टिकेरिया या आजाराचा त्रास आहे. हा अत्यंत धोकादायक रोग आहेत. जगभरात १०० पेक्षा कमी जण या समस्येने ग्रस्त आहेत. डॅनियलचा हा रोग इतका जीवघेणा आहे की घाम आणि अश्रूमुळे तिला बर्याच समस्यांचा सामना करावा लागतो. रिपोर्ट्सनुसार, डॅनियलच्या शरीरावरचा कोणताही भाग अश्रू किंवा घाम यांच्या संपर्कात आल्यानंतर लाल होतो. इतकेच नव्हे तर लाल झाल्यावर डॅनियलच्या शरीरावरचा संबंधित भाग देखील दुखू लागतो.
पोहणे सोडावे लागले
जेव्हा जेव्हा डॅनियल्स पाण्याशी संपर्क साधते तेव्हा प्रचंड वेदना होतात. आधी डॅनियलला पोहण्याची आवड होती, परंतु जेव्हा तीला आजाराबद्दल समजल्यावर तीने पोहणे थांबवले. पाण्यामुळे होणाऱ्या ऍलर्जीमुळे तिला आपली आवडती कला सोडावी लागली.
उन्हाळ्यात अशी घेते काळजी
उन्हाळ्यात तीला घरातच रहावे लागते. बाहेर पडल्यास पुन्हा घामाने अंगाची लाही होऊन तिला त्रास सुरु होतो. उन्हाच्या संपर्कात आल्यास तिच्या शरीराचा संबंधित भाग लाल होऊन त्यावर खाज येते. त्यामुळे घराबाहेर जाण्यापेक्षा घरात राहूनच ती स्वतःची काळजी घेते.
आंघोळीमुळे जीव जाऊ शकतो
पाण्याच्या ऍलर्जीमुळे डेनिअल्सला अॅनाफिलेक्टिकचा शॉक देखील लागू शकतो. जास्त प्रमाणात ऍलर्जी होत असल्यास शॉक लागण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. या शॉकमुळे जीव जाण्याच्या शक्यता असतात. साधे एक बादली पाण्याने आंघोळ केले तरी डेनिअल्सच्या जीवाला धोका असल्याचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
पाणी सेवन करणे फायदेशीर
डॅनियल्सला पाण्यापासून ऍलर्जी आहे, परंतु तिला पाण्याचे सेवन करण्यास काहीच हरकत नाही. पाणी पिल्यामुळे कोणत्याही प्रकारची ऍलर्जी तीला होत नाही. डॅनिएलला ११ वर्षांची असताना याबद्दल माहिती मिळाली.