नाशिक – राज्य शासनाने डिसेंबर 2020 पर्यंत दस्त नोंदणीवर 3 टक्के मुद्रांक शुल्कात सवलत जाहिर केली आहे. या सवलतीचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांना व्हावा यासाठी जिल्ह्यातील सह दुय्यम निबंधक आणि दुय्यम निबंधक कार्यालय डिसेंबर 2020 महिन्यातील प्रत्येक शनिवारी सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन सह जिल्हा निबंधक वर्ग 1 तथा मुद्राक जिल्हाधिकारी कैलास दवंगे यांनी एका शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
दस्त ऐवज नोंदणीची सुविधा 5, 12, 19,26 डिसेंबर 2020 या तारखेस सुरु राहणार आहे. सह दुय्यम निंबधक वर्ग-2 नाशिक क्रमांक 1 ते 7, सह दुय्यम निबंधक वर्ग-2 मालेगांव क्रमांक 1, सह दुय्यम निंबधक वर्ग-2 मालेगांव क्रमांक 3, दुय्यम निबंधक श्रेणी-1 चे सिन्नर क्र.2, निफाड, दिडोंरी, इगतपुरी, येवला कार्यालय येथे डिसेंबर महिन्यातील प्रत्येक शनिवारी सुरु राहणार आहे. वरील तारखांना नागरिकांनी जास्तीत जास्त ‘दस्त’ नोंदणी करुन या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहनही श्री. दवंगे यांनी केले आहे.