नवी दिल्ली – कोरोना लॉकडाऊन उठविल्यापासून रिअल इस्टेट क्षेत्राला चालना मिळाली आहे. देशातील सार्वजनिक क्षेत्रातील बँका आणि खासगी बँका सवलतीच्या दरात गृहकर्ज देण्यास पुढे सरसावल्या आहेत. तसेच विविध बँका ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी प्रोसेसिंग फीवर सूटही देत आहेत. काही बँकांचे गृहकर्ज दर अत्यल्प आहेत. त्यांची माहिती अशी,
कोटक महिंद्रा बँकेने केवळ ६.७५ टक्के दराने कर्ज उपलब्ध करुन दिले आहे.
युनियन बँक ऑफ इंडियाने ६.८० टक्के व्याजदर ठेवले आहेत.
बँक ऑफ बडोदा, बँक ऑफ इंडिया आणि सेंट्रल बँक ऑफ इंडियाने व्याजदर ६.८५ टक्के ठेवला आहे.
एचडीएफसी बँक, कॅनरा बँक, आयसीआयसीआय बँक, पंजाब आणि सिंध बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि एलआयसी हाउसिंग फायनान्स ६.९० टक्के दराने गृहकर्ज देत आहेत.
टीप – गृहकर्जावरील व्याजाचे दर हे विविध बाबींवर अवलंबून असतात. आपला क्रेडिट स्कोर, कर्जाची रक्कम हे सुद्धा महत्त्वाचे ठरते. जर आपला क्रेडिट स्कोर ७६० पेक्षा अधिक असेल तर काही बँका गृहकर्जावर सूट देतात.