मुंबई – Xiaomiच्या Mi 10i 5G या फोनला भारतात चांगलीच पसंती मिळाली आहे. गेल्या महिन्यातच हा फोन लॉन्च झाला आणि काही दिवसांतच मोठ्या प्रमाणात विक्री झाली. Mi 10i 5G स्मार्टफोन ने विक्रीचे सारे विक्रमही मोडीत काढले. अवघ्या तीन आठवड्यांमध्ये तब्बल 400 कोटींपेक्षा जास्त रुपयांची विक्री या फोनने केली आहे. हा फोन भारतात पहिल्यांदा 7 जानेवारीला लॉन्च झाला.
गुगलच्या अहवालानुसार २०२१ मध्ये सर्वाधिक सर्च करण्यात आलेला हा फोन आहे. यावरून Mi 10i 5G च्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. यात १०८ मेगा पिक्सेल प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे. या फोनमध्ये १२०Hz इंटलीजंट AdaptiveSync डिस्प्लेचा वापर करण्यात आला आहे. Snapdragon ७५० 5G च्या प्रोसेसरचा सपोर्ट देण्यात आला आहे. तर पॉवरबॅकसाठी ४८२०mAh ची दमदार बॅटरी देण्यात आली आहे. हा फोन सॉफ्टवेअर आणि हार्डवेअर अश्या दोन्ही दृष्टीकोनातून उत्तम आहे, असा दावा कंपनी करीत आहे. त्यामुळेच लॉन्चिंगनंतर पहिल्या आठवड्याच अमेझॉनवर सर्वाधिक विकला जाणारा फोन म्हणून त्याची नोंद झाली आहे.
किंमत
Mi 10i स्मार्टफोन चा ६GB ६४GB रॅम व्हेरियंट २०,९९९ रुपयांत, तर ६GB १२८GB स्टोरेज व्हेरियंट २१,९९९ रुपयांत आहे. याशिवाय ८GB १२८GB व्हेरियंट २३,९९९ रुपयांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन Pacific Sunrise, Atlantic Blue आणि Midnight Black कलर ऑप्शन मध्ये उपलब्ध आहे.
स्पेसिफिकेशन
Mi 10i स्मार्टफोन मध्ये ६.६७ इंच फुल एचडी डिस्प्ले आहे. याचे रिझोल्युशन १०८०x२४०० पिक्सल आहे. सोबतच स्क्रीनच्या सुरक्षेसाठी कॉर्निंग गोरिला ग्लास-५ देण्यात आला आहे. उत्तम परफॉर्मन्ससाठी Snapdragon ७५०G प्रोसेसर आहे. १०८ मेगा पिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि १६ मेगा पिक्सेलचा सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ३० मिनीटांत ६८ टक्के चार्ज होतो. तर फुल चार्जिंगसाठी अवघे ५८ मिनीटे लागतात.