नाशिक – दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर शेवंतीच्या फुलाने मोठाच भाव खाल्ल्याचे पहायला मिळाले. शेवंतीची फुले २०० रुपये पाव किलो या दराने तर झेंडू २०० रुपये किलो या दराने विक्री झाली. यामुळे दसऱ्याच्या दिवशी ग्राहकांना चढ्या दराने फुली खरेदी करावी लागली.
दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर फुलांच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली आहे. फुलं खरेदीसाठी ग्राहकांनी शहरातील फुलबाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. मात्र, यंदा कोरोनाचे सावट असल्याने फुलांच्या किमतीत वाढ झाली असल्याने ग्राहकांच्या खिशाला कात्री लागली आहे. यंदा प्रथमच झेंडूच्या फुलांचा भाव २०० पार गेल्याने ग्राहकांनी हात आखडता घेतल्याचे सर्वत्र दिसून आले. नवरात्री, दसरा आदी सणांच्या निमित्ताने शेवंती, झेंडू, गुलाब, केवडा, चाफा आदी फुलांच्या मागणीत वाढ झाल्याचे दिसते आहे. लॉकडाऊन तसेच अतिवृष्टीमुळे फुल उत्पादला फटका बसल्याचे दिसून आले. त्यामुळे गेल्यावर्षी ८० ते १०० रुपये दरम्यान असणारे झेंडूचे फुल यंदा २०० पार गेल्याचे पहायला मिळते आहे. अतिपावसामुळे फुलांचे नुकसान झाल्याने शेतकरी सांगत आहेत. त्यामुळेच यंदा दरात वाढ झाली आहे.