नवी दिल्ली – केंद्रीय युवक आणि क्रीडा मंत्रालयाने खेलरत्न पुरस्कारांची शुक्रवारी (२१ ऑगस्ट) घोषणा केली आहे. आघाडीचा स्टार फलंदाज रोहित शर्मा, महिला कुस्तीपटू विनेश फोगट, टेबल टेनिसपटू मनिका बत्रा, पॅरालिम्पिकपटू मारियाप्पन थंगावेलू आणि हॉकीपटू राणी या पाच खेळाडूंना राजीव गांधी खेल रत्न पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. आतापर्यंत तीन क्रिकेटपटूंना खेलरत्न पुरस्कार मिळाला आहे. तर, रोहित हा आता चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. या पाचही खेळाडूंचे शानदार प्रदर्शन आणि त्यांचे देशाच्या विकासातील योगदान लक्षात घेऊन त्यांना हा सर्वोच्च क्रीडा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.