नवी दिल्ली – बिगरबँकिंग कर्जदाता एलआयसी हाउसिंग फायनान्स कंपनीनं एक नवी गृहकर्जाची योजना आणली आहे. या योजनेला गृह वरिष्ठ असं नाव देण्यात आलं आहे. या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक ग्राहकांना कर्जाच्या मुदतीत सहा मासिक हप्त्यांची (ईएमआय) सवलत देण्यात आली आहे. या योजनेचा लाभ पेन्शन योजनेच्या (डीबीपीएस) अंतर्गत येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना देण्यात येईल.
कंपनीकडून सांगण्यात आलं की, मासिक हप्त्यावरील सवलत ३७ व्या, ३८ व्या, ७३ व्या, ७४ व्या, १२१ व्या, १२२ वा हप्ता भरताना मिळेल. या हप्त्याची रक्कम मूळ रकमेमध्ये समाविष्ट होईल. गृहकर्ज कंपनीनं पूर्व भागातही अशाच प्रकारे ईएमआयवर सवलत दिली आहे. कर्ज घेणाऱ्या व्यक्तिचे वय ६५ वर्षांपर्यंत हवे. कर्जाची मुदत ८० वर्षापर्यंत किंवा जास्तीत जास्त ३० वर्ष, ज्या मुदतीत होईल तोपर्यं असेल.
सवलत योजनेत आणखी एक अतिरिक्त लाभ देण्यात येणार आहे. तो म्हणजे, कर्जाचा उपयोग फ्लॅट खेरदी किंवा घर बांधण्यासाठी किंवा घराची डागडुजी किंवा घराचा विस्तार करण्याचासाठीही उपयोग करू शकतो. पंतप्रधान आवास योजना क्रेडिट लिंक्ड सबसिडी योजनेला पूर्ण करणार्या कर्जधारकांना २.६७ लाख रुपयांपर्यंतच्या व्याजावर सबसिडीला पात्र असतील.
एलआयसी हाउसिंग फायनान्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी वाय. विश्वानाथ गौड म्हणाले, गृह वरिष्ठ योजना आपल्या वैशिष्ट्यांमुळे जुलै २०२० मध्ये लॉन्च झाल्यानंतर चांगल्या प्रकारे वाढली आहे. कंपनीकडून ३ हजार कोटींचे जवळपास १५ हजार कर्जवितरण झाले आहे