नवी दिल्ली – मानवाच्या रक्तपेढीबद्दल आपण बरेच काही ऐकलेले असेलच पण प्राण्यांच्या रक्तपेढीबद्दल कधी ऐकले नसेलच, ही गोष्ट विचित्र वाटत असली तरी खरी आहे की, जगातील अनेक देशांमध्ये ‘पाळीव प्राण्यांच्या रक्तपेढी’ तयार केल्या आहेत. या रक्तपेढ्यांमध्ये बहुतेक मांजरी आणि कुत्र्यांच्या रक्त आढळले आहे. कारण यापैकी बहुतेक प्राणी पाळले जातात. जर कुत्रा किंवा मांजरीला रक्ताची गरज भासली असेल तर ही रक्तपेढी त्यांच्यासाठी उपयुक्त आहे.
आपल्याला हे जाणून आश्चर्य वाटेल की, कुत्रे आणि मांजरींचेही मानवांसारखे भिन्न रक्त गट असतात. कुत्र्यांमध्ये १२ प्रकारचे रक्त गट आहेत, तर मांजरींमध्ये तीन प्रकारचे रक्त गट आढळतात. उत्तर अमेरिकेतील ‘वेटरनरी ब्लड बँक्स’ चे प्रभारी डॉक्टर केसी मिल्स यांच्या म्हणण्यानुसार, अमेरिकेतील स्टॉकब्रिज, व्हर्जिनिया, ब्रिस्टो आणि अॅनापोलिस, मेरीलँड या देशांसह उत्तर अमेरिकेतील अनेक शहरांमध्ये प्राणी रक्तपेढी आहेत.
कॅलिफोर्नियामधील डिक्सन आणि गार्डन ग्रोव्ह येथे लोक वेळोवेळी त्यांच्या पाळीव प्राण्यांचे रक्तदान करतात. या संदर्भात डॉक्टर मिल्स म्हणाले की, प्राण्यांना रक्त देण्याची व घेण्याची प्रक्रिया सुमारे अर्धा चालते. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांना भूल देण्याची देखील गरज नाही.
तथापि, ज्या ठिकाणी प्राणी रक्तपेढी नाही अशा ठिकाणी, लोकांना जागरूक करण्यासाठी रक्तदान आणि प्लाझ्मा देणगी कार्यक्रम आयोजित केले जातात.
एका अहवालानुसार, ब्रिटन आणि अमेरिकेत लोकांना प्राण्यांच्या रक्तदानाबद्दल माहिती आहे, तर इतरत्र अद्यापही या रक्तदानाबद्दल जनजागृती करण्याची गरज आहे. भारतात प्राण्यांसाठी रक्तपेढी देखील आहे, ज्याला ‘अॅनिमल ब्लड बँक’ असे नाव आहे.
ही रक्तपेढी तामिळनाडू पशुवैद्यकीय विद्यापीठाच्या अंतर्गत असून मद्रास पशुवैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, चेन्नईच्या क्लिनिक विभागांतर्गत कार्यरत आहे.