नवी दिल्ली – अमेरिकेतील बायडेन सरकारमध्ये मूळ भारतीय वंशाच्या अनेक व्यक्ती दिसतात. त्यांना देण्यात आलेली जबाबदारी देखील महत्त्वाची आहे. याच यादीत आता आणखी एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे किरण आहुजा यांचं.
पेशाने वकील असलेल्या किरण या मानवाधिकार कार्यकर्त्या आहेत. कर्मचारी वर्गाशी संबंधित विभागाच्या प्रमुख म्हणून किरण यांना बायडेन यांची निवड केली आहे.
किरण यांना ज्या विभागासाठी नामांकित करण्यात आलेले आहे, तो विभाग, अमेरिकेतील २० लाख प्रशासकीय अधिकाऱ्यांचा आहे. सिनेटच्या मान्यतेनंतर हे पद सांभाळणाऱ्या त्या पहिल्या भारतीय ठरल्या आहेत. ओबामा यांच्या मंत्रिमंडळातही किरण यांचा समावेश होता. त्यामुळे बायडेन यांच्यासोबत काम करणे हे काही त्यांच्यासाठी नवीन नाही.










