मुंबई ः चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातल्या जिल्हा परिषदेच्या शाळा पुढच्या मंगळवारपासून सुरू आहेत. राज्यात कोरोना विषाणूचे संकट पाहता सर्वत्र ऑनलाईन पद्धतीने शिक्षण सुरू आहेत. मात्र, चंद्रपूर, गडचिरोली सारख्या आदिवासी बहुल आणि नक्षलग्रस्त भागात ऑनलाईन शिक्षणाची सोय नाही. ग्रामीण भागातले हे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये.
या करीता येत्या ४ ऑगस्ट पासून या दोन्ही जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा सुरक्षिततेच्या नियमांचे पालन करून सुरू करण्यात येणार आहेत. यामध्ये वर्गात विद्यार्थ्यांना सुरक्षित अंतरावर बसविण्याची व्यवस्था, मास्क, सॅनेटाइझर देण्यासह संपूर्ण शाळेचे निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहेत. याबाबत शिक्षणमंत्र्यांशी आपली चर्चा झाली आहेत.