मुंबई – हिंदी भाषेमधील अनेक चित्रपट हे गाण्यांमुळे लोकप्रिय होत असतात, त्यातील काही गाणी सर्वांच्याच मनात ठाण मांडून बसतात आणि ओठावर देखील कायम येतात. बॉलिवूडच्या जवळजवळ प्रत्येक चित्रपटात गाणी असतात, फारच क्वचितच चित्रपटांमध्ये गाणी नसतात.
अनेक लोकप्रिय गाण्यांमुळे काही वेळा चित्रपट देखील हिट बनतात म्हणूनच कथा, संवाद याच बरोबर गाण्यांनाही विशेष विचार दिला जातो. इतकेच नाही तर अनेक चित्रपटही असे बनले आहेत की, ज्यात 10 ते 15 गाणी घातली गेली आहेत. विशेष म्हणजे ‘इंद्रसभा’ या जुन्या चित्रपटात 71 गाणी होती. आता आपण अशा काही चित्रपटांबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामध्ये एकही गाणी नाही. यानंतरही प्रेक्षकांना हे चित्रपट खूपच आवडले आणि हे चित्रपट पाहताना लोकांना कंटाळा आला नाही.
भूत
दिग्दर्शक राम गोपाल वर्मा दिग्दर्शित ‘भूत’ हा चित्रपट 2003 मध्ये आला होता. अजय देवगन आणि उर्मिला मातोंडकर यांनी चित्रपटात एकत्र काम केले होते. बर्याचदा हॉरर चित्रपटांमध्ये गाणी कमी असतात, पण या चित्रपटामध्ये एकही गाणे नव्हते. तरीही हा चित्रपट लोकांना फार आवडला.
ब्लॅक
2005 सालच्या ‘ब्लॅक’ चित्रपटाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले होते. भन्साळी यांचे बहुतेक चित्रपट गाणी प्रधान आहेत, पण या चित्रपटात एकही गाणे नव्हते. या चित्रपटात मेगास्टार अमिताभ बच्चन आणि राणी मुखर्जी यांनी एकत्र काम केले होते, तसेच दोघांचेही कौतुक झाले. या चित्रपटात राणीने अंध आणि कर्णबधीर मुलीची भूमिका केली होती.
ए वेनस्डे
2008 साली ‘ए वेनस्डे’ हा चित्रपट प्रदर्शित आला. या चित्रपटात अनुपम खेर आणि नसरुद्दीन शाह मुख्य भूमिकेत होते. या सिनेमात आम आदमीची कहाणी असून तो स्वतःच सिस्टमशी स्पर्धा करतो. चित्रपटात एकही गाणे नव्हते. परंतु प्रेक्षक चित्रपटाचा कंटाळा आला नाही, या उलट चित्रपटाची बरीच प्रशंसा झाली.
भेजा फ्राय
2007 चा ‘भेजा फ्राय’ हा त्या काळातील विनोदी चित्रपटांपैकी एक होता. या चित्रपटाची एक अगदी साधी कथा होती परंतु लोकांना ती खूपच आवडली. या चित्रपटात रजत कपूर, विनय पाठक, मिलिंद सोमण असे कलाकार होते. ‘भेजा फ्राय’ चित्रपटात एकही गाणे नव्हते, परंतु चित्रपट इतका चांगला होता की त्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
लंचबॉक्स
दिवंगत अभिनेता इरफान खान अभिनीत ‘द लंचबॉक्स’ या चित्रपटाचे खूप कौतुक झाले. इरफानच्या अभिनयामुळे या चित्रपटाला वेगळं स्थान मिळालं. या चित्रपटामध्ये दोन जणांची कहाणी आहे जी एकमेकांना ओळखत नाहीत, परंतु ते एका लंचबॉक्सच्या माध्यमातून भेटतात. यात एकही गाणे नव्हते परंतु लोकांना हा चित्रपट खूप आवडला. इरफान खान हिट चित्रपटांच्या यादीमध्ये या चित्रपटाचा समावेश आहे.