नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघ सध्या खेळाडूंनी परिपूर्ण असून नवीन युवा खेळाडू टीम इंडियामध्ये स्थान मिळवण्यासाठी रात्रंदिवस मेहनत घेत आहेत. या युवा खेळाडूंना प्रशिक्षण देण्यात दोन्ही प्रशिक्षक आणि कप्तान यांचे खूप योगदान आहे. सध्या टीम इंडियामध्ये काही तरुण खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. त्यापैकी तीन युवा खेळाडू भविष्यात भारतीय संघाचे नेतृत्व करू शकतील.
कोण आहेत हे तीन खेळाडू चला जाणून घेऊ या…
श्रेयस अय्यर : १० डिसेंबर २०१७ रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणारा २६ वर्षीय श्रेयस अय्यर आगामी काळात भारतीय संघाच्या कर्णधार होऊ शकतो. त्याच्याकडे तशी पूर्ण क्षमता आहे. गेल्या काही वर्षांपासून तो आयपीएलमध्ये दिल्ली संघाचे नेतृत्व करत आहे. गेल्या हंगामात दिल्ली संघाचा कर्णधार म्हणून अय्यरने अंतिम फेरी गाठण्यासाठी प्रयत्न केला. मात्र, दिल्लीला विजेतेपदाच्या सामन्यात मुंबईविरुद्ध पराभवाला सामोरे जावे लागले. अय्यरने आतापर्यंत भारतासाठी २१ वन-डे आणि २४ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. तसेच आयपीएल सामन्यांत योगदान दिले आहे.
के.एल. राहुल : आयपीएलमध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार असलेला २८ वर्षीय के.एल. राहुल बराच परिपक्व खेळाडू आहे. त्याने पंजाबसाठी सर्वोत्कृष्ट कर्णधार म्हणून काम केले आहे. भविष्यात टीम इंडियाच्या कर्णधार निवडीत केएल राहुल हे नावही समोर येऊ शकते. राहुलने आतापर्यंत भारतासाठी ३६ कसोटी, ३५ एकदिवसीय आणि ४५ टी -20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर आयपीएलमध्ये ८१ सामने खेळले गेले आहेत.
हार्दिक पांड्या : टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पांड्या अद्याप आयपीएल किंवा इतर कोणत्याही स्वरूपात कर्णधारपद भूषवू शकला आहे, परंतु त्याच्या क्रिकेट क्षमतेबद्दल कोणालाही शंका नाही. त्याच्याकडे कधीही सामना उलटण्याची क्षमता आहे. भविष्यात हार्तिक हा कर्णधार म्हणून दिसू शकतो, हार्दिकने टीम इंडियाकडून आतापर्यंत ११ कसोटी सामने, ५७ वन-डे आणि ४३ टी -२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. त्याचबरोबर त्याने आयपीएलमध्ये ८० सामन्यांमध्ये कामगिरी केली आहे.