नवी दिल्ली – कोरोना काळात बहुतांश जणांच्या नोकऱ्यांवर गदा आली आहे. याकाळात बरेच जण २५ हजार किंवा त्यापेक्षा कमी पगारावर काम करत होते. त्यामुळे जर पगार कमी असेल तर टेन्शन घेऊ नका. कारण अशा लोकांसाठी हरियाणा सरकार एक मोठी योजना घेऊन आली आहे. ज्याअंतर्गत ५१ हजार रुपयांच्या सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
हरियाणा सरकारतर्फे ही विशेष योजना राबवण्यात आली आहे. यामध्ये शिक्षण, लेखन, औषधोपचार आणि लग्नासह १९ प्रकारच्या सुविधांचा फायदा घेता येणार आहे. या योजनेत कामगारांना सरकारच्या कल्याण निधीमध्ये दरमहा २५ रुपयांवरून ७५ रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करावी लागणार आहे. उदाहरणार्थ, जर एखाद्या कामगारांच्या पगारामधून २५ रुपये वजा केले गेले तर कंपनी व्यवस्थापनाच्या वतीने ५० रुपये जोडले जातील. शासनाच्या निर्देशानुसार प्रत्येक कारखान्याच्या गेटवर या योजनेचा फलक लावणे बंधनकारक आहे. हरियाणा सरकारच्या या योजनेंतर्गत जर एखाद्या महिला कामगारांचे लग्न होणार असल्यास त्यांना ५१ हजार रुपये दिले जातील. दुसरीकडे, जर मजुरांना मुलगी असेल व तीचा विवाह करणार असल्यास त्यास सरकारतर्फे ५१ हजार रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. लग्नाच्या तीन दिवस आधी हे पैसे खात्यावर जमा केले जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
शिक्षणासाठी मिळणार आर्थिक मदत
मजुरांच्या मुलांसाठी १ ते १२ पर्यंतच्या शिक्षणात ड्रेस, पुस्तके इत्यादीसाठी ३ ते ४ रुपयांची मदत दिली जाणार आहे. तसेच नववीच्या पुढे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी १६ हजार रुपयांपर्यंत अनुदान दिले जाणार आहे. त्याचप्रमाणे, त्यांना क्रीडा क्षेत्रासाठी स्वतंत्र आर्थिक सहाय्य देखील दिले जाणार असल्याचे हरियाणा सरकारने सांगितले आहे.