नवी दिल्ली – नवरात्र, दसऱ्याच्या मुहूर्तावर ई-कॉमर्स साईट अॅमेझॉनने ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सुरु केला आहे. सुमारे एक महिना हा सेल सुरु राहणार आहे. त्यामुळे सणासुदीचे महिनाभर चालणार आहे. त्यामुळे ग्राहकांना याचा फायदा होणार आहे. यात स्मार्टफोन, लॅपटॉप, स्पीकर्स आणि घरगुती वापरातील वस्तुंचा समावेश आहे. परंतु बजेट कमी असणाऱ्या मंडळींसाठी देखील यात आकर्षक ऑफर्स समाविष्ट करण्यात आल्या आहेत. ५००० रुपयांपर्यंतच्या खरेदीसाठी आकर्षक डील्स देण्यात आल्या आहे.
या आहेत आकर्षक डील्स…
एम आय स्मार्ट बँड 5
Amazfit Bip U
भारतीय बाजारपेठेत Amazfit Bip U उपलब्ध करून देण्यात आली आहे. ३४९९ रुपयांच्या किंमतीत उपलब्ध करून देण्यात आले आहे. एमआरपी ५९९९ रुपये आहे. आयसीआयसीआय बँकेचे क्रेडिट कार्ड विकत घेतल्यास हे स्मार्टवॉच विकत घेताना ५ टक्के कॅशबॅक देखील मिळणार आहे.
फायर टीव्ही स्टिक
फायर टीव्ही स्टिक देखील एक उत्तम डिव्हाइस आहे आणि ते विकत घेण्याची ही चांगली संधी आहे. त्याची एमआरपी किंमत ४९९९ रुपये आहे. परंतु सेलमध्ये ग्राहक केवळ २४९९ रुपयांमध्ये हे खरेदी करता येणार आहे. या डिव्हाइसोबत अलेक्सा व्हॉइस रिमोट देखील मिळणार आहे.