मुंबई – जर आपण ऑफिस किंवा मार्केटमध्ये जाण्यासाठी स्वस्त दुचाकी शोधत आहात, तर आपल्यासाठी इलेक्ट्रीक स्कूटर सर्वोत्तम पर्याय ठरू शकतो. त्यामुळे आपला दैनंदिन खर्च मोठ्या प्रमाणात वाचू शकतो. आज आपण भारतात उपलब्ध असलेल्या अशाच बजेट गाड्यांच्या बाबतीत जाणून घेऊया. अशा गाड्या ज्या आपण अत्यंत कमी किंमतीत घरी आणून दैनंदिन कामासाठी वापरू शकतो.
Hero Flash LX VRLA: या गाडीत २५० बॅटची बीएलडीसी हब मोटर आहे. या मोटरला पॉवर देण्यासाठी ४८व्ही-२८एएच ची बॅटरी देण्यात आली आहे. रेंजचा विचार केला तर जवळपास ५० किलोमीटरपर्यंत आहे. अर्थात एकदा चार्जिंग केले की ५० किलोमीटरपर्यंत स्कूटर चालू शकते. या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत ४२ हजार ६४० रुपये आहे. तर यात डिजीटल स्पीडोमीटर, टेलिस्कोपिक सस्पेंशन, मॅग एलॉय व्हील, एलईडी हेडलँप, कंफर्टेबल सिटींग आणि क्रॅश गार्डसारखे फिचर्स आहेत.
Odysse E2Go Lite : या स्कूटरमध्ये २५० वॅट, ६० व्होल्ट बीएलडीसी मोटर देण्यात आली आहे. यात दोन प्रकारच्या बॅटरी आहेत. १.२६ किलो वॅट आणि २८ एम्पेयर या दोन्ही बॅटरीजमध्ये चोरी होण्यापासून रोखणारी यंत्रणा लावण्यात आली आहे. इलेक्र्टीक स्कूटरची जास्तीत जास्त स्पीड २५ किलोमीटर प्रती तास अशी आहे. अर्थात फूल चार्जींगवर ६० किलोमीटरपर्यंत रेंज आहे. फूल चार्जिंगसाठी साडेतीन ते चार तास लागतात.
Hero Optima e2: एरोडायनामिक बॉडी डिझाईनवाल्या हिरो ओप्टीमा ई-२मध्ये ५१.२व्ही-३०एएच क्षमतेची बॅटरी लावण्यात आली आहे. पूर्ण चार्जींगवर ५०किलोमीटरपर्यंत ही गाडी धावू शकते. या गाडीची किंमत ४७ हजार ४९० रुपये