नवी दिल्ली – कुटुंबामध्ये ४ किंवा ५ पेक्षा अधिक कुटुंब असल्याने अनेक जण ७ सीटर कारला प्राधान्य देतात. अशा ग्राहकांसाठी आज आम्ही माहिती देत आहोत या भारतीय कारबद्दल. दहा लाखाहून कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या ७ सीटर कार अशा….
मारुती सुझुकी अर्टिगा व्हीएक्सआय:
मारुती सुझुकी एर्टिगा ही भारतातील एक लोकप्रिय फॅमिली कार असून ग्राहकांची तिला खूपच पसंती आहे. या कारचे इंजिन एमपीव्हीमध्ये 1462 सीसी, 4 सिलेंडर इनलाइन, 4 झडप किंवा सिलेंडर डीओएचसी पेट्रोल इंजिन आहे. सदर इंजिन 6000 आरपीएमवर 103 बीएचपीची जास्तीत जास्त शक्ती आणि 4400 आरपीएमवर 138 न्यूटन मीटरची पीक टॉर्क जनरेट करते. फोर व्हील ड्राईव्ह एमपीव्ही आहे. या कारची इंधन क्षमता 45 लिटर आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे त्यात मॅन्युअल एअर कंडिशनर, टिल्ट स्टीयरिंग अॅडजस्टमेंट, रियर पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ईबीडी, ड्युअल फ्रंट एअर बॅग्स, स्पीड सेन्सिंग डोर लॉक, इंजिन अॅम्मोबिलायझर यासारख्या वैशिष्ट्यांचा समावेश आहे. मारुती सुझुकी अर्टिगा या काराची किंमत 8.34 लाखापासून पुढे आहे.
डॅटसन गो प्लस ए
डॅटसन गो प्लस ही कार भारतातील एका मोठ्या कुटुंबासाठी लोकप्रिय कार ठरत आहे. या कारमध्ये 1198 सीसी 3 सिलेंडर, इन-लाइन 4 वाल्व किंवा सिलेंडर डीओएचसी पेट्रोल इंजिन आहे. सदर इंजिन 5000 आरपीएम वर 67 बीएचपी उर्जा आणि 4000 आरपीएम वर 104 न्यूटन मीटरची पीक टॉर्क जनरेट करते. या कारची इंधन क्षमता 35 लिटर आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे कारमध्ये मागील पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, ड्युअल फ्रंट एअरबॅग, सेंट्रल लॉकिंग, ईबीडी, स्पीड सेन्सिंग डोर लॉक, इंजिन अॅम्मोबिलायझरचा समावेश आहे.
तसेच डॅटसन गो प्लस ही कार भारतातील कोणत्याही शहरात 5.01 लाख या किंमतीत खरेदी करता येईल.
रेनॉल्ट ट्रायबर आरएक्सएल
काही काळापूर्वीच लॉन्च झालेल्या रेनॉल्ट ट्रायबर आरएक्सएल ही कार कमी कालावधीत भारतात बरीच लोकप्रिय झाली आहे. सदर कार मोठ्या कुटुंबासाठी परिपूर्ण मानली जाते. या कारमध्ये 999 सीसी 3 सिलेंडर इनलाइन, 4 झडप किंवा सिलेंडर, डीओएचसी इंजिन आहे. हे इंजिन 6250 आरपीएम वर 71 बीएचपीची जास्तीत जास्त शक्ती आणि 3500 आरपीएम वर 96 न्यूटन मीटरची पीक टॉर्क जनरेट करते. या कारची इंधन क्षमता 40 लिटर आहे. या कारचे वैशिष्ट्ये म्हणजे यामध्ये टिल्ट स्टीयरिंग अॅडजस्टमेंट, रियर पार्किंग सेन्सर, अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टम, इलेक्ट्रॉनिक ब्रेक फोर्स डिस्ट्रीब्यूशन, सीट बेल्ट वॅर्निंग, स्पीड सेन्सिंग डोअर लॉक आणि इंजिन इमोबिलायझरचा समावेश आहे. सदर कारची किंमती ही 5.74 लाखांमध्ये किंमतीत खरेदी केली जाऊ शकते.