मुंबई – भारतात आता कनेक्टेड कार फिचर्स केवळ लक्झरी कार पुरता मर्यादित नाहीत. कारण ज्या ग्राहकांचे बजेट कमी आहे पण तरीही ज्यांना कनेक्टेड कार खरेदी करण्याची इच्छा आहे. त्यांच्यासाठी आता मार्केटमध्ये अत्यंत स्वस्त कार लॉन्च झालेल्या आहेत. अश्या काही गाड्यांची माहिती आज घेऊया…
Tata Altroz iTurbo
Altroz iTurbo मध्ये १.२ लीटरचे टर्बो पेट्रोल इंजिन लावण्यात आले असून ते 110bhp चे मॅक्झिमम पॉवर आणि 150 Nm चे पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे. या गाडीत व्हॉईस कमांड (हिंदी, इंग्रजी आणि हिंग्लीश), हाईट एड्जस्टेबल ड्रायव्हर सीट, मल्टी ड्राईव्ह मोड, रेअर आर्मरेस्ट, रेअर पॉवर आऊटलेट, २ एडिशनसल ट्विटर्स, वन शॉट अप विंडो, एक्स्प्रेस कूल, क्रुज कंट्रोल, पुश स्टार्ट व स्टॉप बटणसह अनेक आकर्षक फिचर्स देण्यात येत आहेत. यासोबतच टाटाच्या कनेक्टेड कारचे iRA हे तंत्रज्ञान सामील करण्यात आले आहे. या गाडीची लॉन्चिंग किंमत ७.७३ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.
Hyundai i20
इंजिन आणि पॉवरचा विचार केला तर यात इंजिनचे ऑप्शन्स मिळतात. यात एडव्हान्स १.२ कप्पा पेट्रोल इंजिन आहे, ते ११९७ सीसीचे आहे. हे ६ हजार आरपीएमवर ८३ पीएसच्या मॅक्झिमम पॉवर आणि ४२०८ आरपीएमवर ११.७ केजीएमचे टॉर्क जनरेट आहे. दुसरे इंजिन १.५ लीटरचे यूटू सीआरडीआय डिझेल इंजिन आहे. ते १४९३ सीसीचे आहे. तिसरे १.० लीटरचे कप्पा टर्बो जीटीआय पेट्रोल इंजिन आहे ते ९९८ सीसीचे आहे. या गाडीची किंमत भारतात ६.७९ लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.