या निवडीसाठी माकप जिल्हा व राज्य समितीने त्यांची उमेदवारीला मंजूरी दिली होती. गणित विषयात बीएससी शिक्षण घेणाऱ्या आर्य या शहरातील मुदावणमुगल भागातून प्रथमच नगरसेवक म्हणून निवडल्या गेल्या आहेत. अधिक शिक्षित महिला नेतृत्व पुढे यावे या अपेक्षने पक्षातून त्यांचे नाव महापौरपदासाठी समोर आले आहे. १०० सदस्यांच्या महापालिकेत निवडणूकीमध्ये पक्षाने ५१ जागा जिंकल्या आहेत. तर ३५ जागा मिळून भाजपा हा मुख्य विरोधी पक्ष बनला असून कॉंग्रेसप्रणीत यूडीएफला केवळ १० जागा मिळाल्या आहेत. तसेच चार अपक्षही निवडून आले आहेत.
शिक्षण सुरू
या निवडीवर माध्यमांशी बोलताना आर्य म्हणाल्या की, हा पक्षाचा निर्णय आहे असून मी याला बांधील आहे. या निवडणुकीत लोकांनी मला कार्यासाठी संधी व प्राधान्य दिले. लोकांची इच्छा होती की त्यांचा प्रतिनिधी शिक्षित झाला पाहिजे. आता माझा शैक्षणिक अभ्यास सुरू असतानाच मी महापौरांच्या जबाबदाऱ्या पार पाडणार आहे.
कोण आहेत आर्य राजेंद्रन ?
आर्य केरळची राजधानी तिरुअनंतपुरम येथील ऑल सेंट कॉलेजमध्ये शिकत असून. बीएससी गणिताची द्वितीय वर्षाची विद्यार्थिनी आहेत. तरूण वयापासूनच त्या राजकारणात खूप सक्रिय आहेत. सध्या त्या भारतीय छात्र महासंघाच्या राज्य समितीची सदस्य आहेत. त्या बालसंगमच्या केरळच्या अध्यक्षा देखील आहेत. बालसंगम ही सीपीएमची मुलांची प्रशिक्षण शाखा आहे.
प्राथमिक शाळांचे लक्ष्य
निवडणुकीपूर्वी आर्य यांनी सांगितले की, जर निवडणूक जिंकली तर सध्या सुरू असलेल्या विकासकामांऐवजी त्या प्राथमिक शाळा सुधारण्याचे काम करतील. तसेच पक्षाने दिलेली कार्य भूमिका आनंदाने साकारेल. आर्य यांनी आशा व्यक्त केली आहे की तिचा अभ्यास आणि राजकीय कार्य एकाच वेळी पुढे जाईल. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत आर्य सर्वात तरुण उमेदवार होत्या.
फडणवीसांना टाकेल मागे
देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भारतातील सर्वात तरुण महापौरचा विक्रम होता. ते वयाच्या २७व्या वर्षी महापौर झाले होते. आता आर्या हिने देवेंद्र यांना मागे टाकत २१व्या वर्षीच महापौरपद स्विकारले आहे.