शनिवार, जून 21, 2025
India Darpan Live
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
No Result
View All Result
India Darpan Live
No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर
ADVERTISEMENT

या आहेत ओबीसी महामंडळाच्या योजना. नक्की जाणून घ्या

by India Darpan
ऑगस्ट 18, 2020 | 4:36 pm
in राज्य
0
download

चंद्रपूर – महाराष्ट्र राज्य इतर मागासवर्गीय वित्त आणि विकास महामंडळाअंतर्गत ओबीसी प्रवर्गातील युवक-युवतींसाठी विविध योजना उपलब्ध आहेत. या योजनेचा युवक-युवतींनी लाभ घ्यावा, असे आवाहन राज्याचे आपत्ती व्यवस्थापन, मदत पुनर्वसन, इतर मागास बहुजन कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले आहे.

अशा आहेत योजना:

रु १ लक्षची थेट योजना:

या योजनेअंर्तगत महाराष्ट्र शासनाने इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगाराकरीता, लघु उद्योग सुरु करण्यासाठी १ लाखाची विना व्याज थेट योजना सुरु केली आहे.सदर योजनेत नियमित परतफेड न करणाऱ्या लाभार्थीना दसादशे ४ टक्के व्याज आकारण्यात येईल व कर्ज परतफेडीची मुदत ४ वर्ष असणार आहे.

२० टक्के बीज भांडवल योजना:

या योजनेअंतर्गत कमाल मर्यादा रु.५ लाख पर्यंतचे प्रकल्पास मंजुरी देण्यात येते. कृषी व संलग्न व्यवसाय, वाहतूक क्षेत्राशी संबधीत व्यवसाय तसेच पारंपरिक, लघु व सेवा उद्योगासाठी कर्ज देण्यात येते. नाविन्यपूर्ण व्यवसायासाठी कर्ज मंजुरीस प्राधान्यदेण्यात येईल. मंजूर कर्ज रकमेच्या ५% लाभार्थी, २०% महामंडळ व ७५% बॅकेचा सहभागआहे. महामंडळाच्या कर्ज रकमेवर ६% व्याज दर असुन बँकेच्या कर्ज रकमेवर बॅकेचा व्याज दर लागू राहील. कर्जाची परतफेड ५ वर्षात करायची आहे. बीज भांडवल योजनेंतर्गत महामंडळाकडे पर्याप्त निधी उपलब्ध आहे.

वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना:

या योजनचे स्वरूप बँकेने रु. १० लाख पर्यंतच्या मर्यादेत कर्ज मंजूर केलेल्या अर्जदाराने वेळेत कर्जाचे हप्ते वेळेत भरल्यानंतर व्याजाची रक्कम (१२ टक्के मर्यादेत) अर्जदाराच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळामार्फत जमा करण्यात येईल. सदर योजना संपूर्णपणे संगणीकृत आहे. कर्ज परतफेडीचा कालावधी बॅक निकषांनुसार  आहे.

गट कर्ज व्याज परतावा योजना:

या योजनेअंर्तगत महाराष्ट्रातील इतर मागास वर्गीय प्रवर्गातील महामंडळाच्या निकषांनुसार विहीत केलेल्या वार्षिक उत्पन्न मर्यादेतील उमेदवारांच्या बचत गट, भागीदारी संस्था, सहकारी संस्था, कंपनी (कंपनी अधिनीयम २०१३ अंतर्गत), एलएलपी, एफपीओ अशा शासन प्रमाणीकरण प्राप्त संस्थाना बँकेतर्फे स्वयंरोजगार उद्योग उभारणी करीता जे कर्ज दिले जाईल, त्या कर्ज रक्कमेवरील व्याज परतावा हा बॅक प्रमाणीकरणानुसार महामंडळाकडुन अदा केला जाईल. या योजनेचे स्वरूप पुढील प्रमाणे आहे. नॉन क्रिमीलेअर करिता असलेल्या कौटुंबिक वार्षिक उत्पन्न मर्यादेत असलेल्या उमेदवारांच्या गटांकरिता असणार आहे. बँकेकडून प्रत्येक गटात कमीत कमी रुपये १० लक्ष ते जास्तीत जास्त रुपये ५० लक्ष पर्यंतच्या मंजूर उद्योग उभारणी करीता आहे. मंजूर कर्जावर ५ वर्षापर्यंत अथवा कर्ज कालावधी यापैकी जो कमी असेल ते कर्ज मंजूर केलेल्या गटाने वेळेत कर्जाचे हप्ते भरल्यास,  हफ्ता भरल्यावर जास्तीत जास्त १२ टक्के व्याजदराच्या आणि रुपये १५ लाखाच्या मर्यादेत त्यातील व्याजाची रक्कम त्यांच्या आधार लिंक बँक खात्यात दरमहा महामंडळा मार्फत जमा करण्यात येईल. महामंडळ केवळ बँकेने वेळेत वसूल केलेली योग्य व्याज रक्कम अदा करेल. इतर कोणतेही शुल्क, देयके अदा करणार नाही.

इच्छुक उमेदवारांनी योजनेसंदर्भात http://www.msobctc.org या संकेतस्थळाला भेट द्यावी तसेच कर्ज योजनेचा लाभ घेण्यासाठी व अधिक माहीतीसाठी महाराष्ट्र राज्य, इतर मागासवर्गीय, वित्त आणि विकास महामंडळ (मर्या) या कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन वडेट्टीवार यांनी केले आहे.

Follow India Darpan
ताज्या बातम्या आणि चर्चांसाठी आमच्या सोशल मीडियावर जोडा!
WhatsApp Channel
Join Now
Telegram Group
Join Now
YouTube Channel
Subscribe

Previous Post

अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी तज्ज्ञांनी केल्या या सूचना; मुख्यमंत्र्यांसमवेत बैठक

Next Post

धडधड कायम. घमासान युक्तीवाद; अंतिम वर्ष परीक्षेबाबत निकाल राखीव

Next Post
court

धडधड कायम. घमासान युक्तीवाद; अंतिम वर्ष परीक्षेबाबत निकाल राखीव

प्रतिक्रिया व्यक्त करा उत्तर रद्द करा.

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

ताज्या बातम्या

राशीभविष्य प्रातिनिधीक फोटो

या व्यक्तींनी आरोग्याच्या तक्रारीबाबत दुर्लक्ष करू नये, जाणून घ्या, शनिवार, २१ जूनचे राशिभविष्य

जून 20, 2025
iiii e1750433022616

मुंबईत मुख्यमंत्री, केंद्रीय सहकार मंत्री यांच्या उपस्थित ‘सहकार से समृद्धी’ राष्ट्रीय परिसंवाद…

जून 20, 2025
rbi 11

आरबीआयने या पेमेंट्स बँकेला ठोठावला २९.५ लाख रुपयाचा आर्थिक दंड

जून 20, 2025
rohit pawar

राज्य शासनाने १५ दिवसांच्या जाहिरातीसाठी १० कोटी ६० लाख खर्च करण्याचा घेतला निर्णय…रोहित पवार यांची टीका

जून 20, 2025
vidhanbhavan

विधानभवनमध्ये २३ व २४ जून रोजी ही महत्त्वपूर्ण राष्ट्रीय परिषद…हे मान्यवर राहणार उपस्थित

जून 20, 2025
परीक्षा भवन 3

मुक्त विद्यापीठाच्या या शिक्षणक्रमांच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठी प्रवेश परीक्षा देणे आवश्यक

जून 20, 2025
ADVERTISEMENT
  • Privacy Policy

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011

No Result
View All Result
  • Home
  • मुख्य बातमी
  • महत्त्वाच्या बातम्या
  • संमिश्र वार्ता
  • स्थानिक बातम्या
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • भविष्य दर्पण
  • मनोरंजन
  • क्राईम डायरी
  • इतर

© India Darpan Live. 112, Kharbanda Park, Near Dwarka, Dwarka, Nashik, Maharashtra 422011