मुंबई – जर तुम्ही ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून कर्ज घेतले आहे आणि आता त्या कंपनीचे रिकव्हरी एजंट वारंवार फोन करून तुम्हाला किंवा तुमच्या कुटुंबियांना त्रास देत असतील तर तुम्ही याची तक्रार थेट सायबर क्राईम ब्रँचमध्ये करू शकता. देशभरात अशा तक्रारींमध्ये मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
हैदराबादला कारवाई
तात्काळ ऑनलाइन लोनच्या मोहात फसून मोठे नुकसान ओढावून घेललेले एक दोन नव्हे तर ३० ते ४० लोक दररोज देशातील विविध सायबर क्राईम विभागात तक्रार घेऊन येत आहेत. तर तिकडे हैद्राबादच्या सायबर क्राईम ब्रांचने धडक कारवाई करत कैश मामा, लोन जोन, धनाधन लोन, कैश अप, कैश बस, मेरा लोन आणि कैश झोन सारखे अनेक मोबाइल ई-लोन अॅप्स गुगलच्या प्ले स्टोर वरून हटवले आहेत.
मोठी टोळी सक्रीय
ऑनलाइन अॅपच्या माध्यमातून कर्ज वाटप करणारी मोठी टोळीच कार्यरत असल्याचे सायबर पोलिसांचे म्हणणे आहे. पोलिसांच्या कारवाईनंतर या ऑनलाइन अॅपच्या रिकव्हरी एजंट्सचे फोन येणे बंद झाल्याचे ग्राहक सांगत आहेत. शिवाय, अॅप गुगलने हटवल्यानंतर आता त्याची अपडेट मिळेनाशी झाल्याने बरेच लोक भविष्यातील फसवणुकीपासून वाचल्याचे कळते.
पोलिसांकडे जा
राष्ट्रीय विधी विद्यापीठाच्या सायबर क्राईम विभागाचे अध्यक्ष अतुल पांडेय यांच्यानुसार जर ऑनलाइन अॅपला सबमिट केलेली आपली वैयक्तीक माहिती प्रस्तुत अॅप अन्यत्र काही कारणासाठी वापरत असेल तर तो गुन्हा आहे आणि त्यासाठी पोलिसांत तक्रार केली जाऊ शकते.
न वाचता हे करूच नका
सायबर क्राईम भोपाळचे ए.एस.पी रजत सकलेचा यांनी सांगितले की नॉन-बैंकिंग फायनान्स कंपनीज आणि त्यांनी बनविलेले अॅप बहुतेक वेळा खोट्या असतात. असल्या ऑनलाइन अॅपवर आलेला कोणताही दस्तऐवज चुकुनही न वाचता साईन करू नका.
एजंट्सची नावे
बैंक व्यवस्थापक शैलेंद्र श्रीवास्तव यांच्या मते कर्ज देणाऱ्या कोणत्याही वित्तीय किंवा गैर वित्तीय संस्थेला आपल्या एजंट्सची नावे सांगणे अनिवार्य आहे. अॅपवर तुम्हाला एजंटचे नाव मिळत नसेल तर अश्या ठिकाणहून पैसे घेणे टाळा, असेही त्यांनी स्पष्ट केले.