मुंबई – ‘जो जिता वही सिकंदर’, ‘अंजाम’, ‘कभी हा कभी ना’ अशा चित्रपटांमध्ये दिसलेला अभिनेता दीपक तिजोरी हा सध्या जरी लाईम लाइटमध्ये नसला तरी त्याची मुलगी समारा तिजोरी मात्र चांगलीच चर्चेत असते.
सध्या स्टारकिड्स चर्चेत असतात. त्यातच आता समाराची भर पडली आहे. फरक एवढाच की, इतर स्टारकिड्स आपल्या चित्रपटातील कामामुळे सोशल मीडियावर चर्चेत असतात. पण समारा सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत असते. वडिलांप्रमाणेच तिलाही अक्टिंगमध्ये करियर करायचे आहे. ‘ग्रँड प्लॅन’ ही तिची शर्ट फिल्म रिलीज झाली आहे. यात तिने मोठ्या प्रमाणावर बोल्ड सीन दिले आहेत. दिग्दर्शक रोहित धवन यांच्या ढिशूम या चित्रपटात समारा हिने धवन याना मदत केली आहे. समाराचे आई वडील शिवानी आणि दीपक तिजोरी यांच्यामध्ये बिनसल्यानंतर ती चर्चेत आली. अवघी १३ वर्षांची असताना समाराचे अपहरण झाले होते. त्यातून तिने कशीबशी स्वतःची सुटका करून घेतली होती.