मुंबई – कधीकधी एखादी गोष्ट करण्यासाठी माणूस इतका आतूर होतो की जोपर्यंत ते काम होत नाही, त्याला चैन पडत नाही. असाच एक किस्सा इंग्लंडमधील माणसाचा आहे. त्याने ड्रायव्हींग शिकण्यासाठी तब्बल १५७ वेळा टेस्ट दिली आणि १५८व्या वेळी तो पास झाला. ही व्यक्ती लेखी परीक्षेत वारंवार नापास होत होता.
या व्यक्तीने ड्रायव्हिंग टेस्ट पास होण्यासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केले. सोशल मिडीयावर हा किस्सा व्हायरल झाल्यानंतर लोकांनी आश्चर्य व्यक्त केले. तसेच इतकेवेळा वारंवार नापास होण्याचे काय कारण असावे असा प्रश्नही अनेकांना पडला. ड्रायव्हिंग आणि व्हेइकल एजन्सीने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंतचा सर्वांत वाईट परफॉर्मन्स एका महिलेचा आहे जिने ११७ वेळा थेअरी टेस्ट दिली तरीही पास होऊ शकलेली नव्हती. प्रॅक्टीकल क्लीयर करण्याच्या बाबतीत ७२ वर्षीय एका व्यक्तीने लायसन्स घेण्यासाठी ४३ वेळा टेस्ट दिली आहे. तर एका महिलेने ४१ वेळा टेस्ट दिली आहे. सोशल मिडीयावर लोक या घटनेची चांगलीच मजा घेत आहेत. काही प्रयत्नांचे कौतुक करीत आहेत, तर लोक टीका करीत आहेत.