मौलिकने सांगितले की, सन २०१६ मध्ये त्याला जेईई परीक्षेमध्ये १३००० वा क्रमांक मिळाला होता. वास्तविक त्याला मॅकेनिकल इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश हवा होता. परंतु त्याला सिव्हील अभियांत्रिकीमध्ये प्रवेश मिळाला, तो पुढे म्हणाला की, माझे वडील कमलेशभाई हे डायमंड कामगार आहेत. त्याचा पगार दरमहा १५ हजार रुपये आहे. उच्च शिक्षणाचे वार्षिक शुल्क १ लाख ३० हजार रुपये होते. माझ्या वडिलांनी फक्त आठवीपर्यंत शिक्षण घेतले होते, परंतु त्यांनी मला अभियंता व्हावे हे पहावेसे वाटले. आज त्याचे स्वप्न पूर्ण झाले. संस्थेला अव्वल क्रमांक मिळाला आहे. ४ वर्षे अभ्यास करून मी वार्षिक साडेसहा लाख रुपयांच्या पॅकेजवर नोकरी सुरू केली आहे.