नाशिक – मोहम्मद दिलावर नावाच्या पक्षीसंवर्धक व अभ्यासकाला २००७ च्या सुमारास एक गोष्ट ध्यानात आली की मूळ भारतीय वनस्पती शोधणे किती अवघड झाले आहे. रोपवाटिकांमध्ये परदेशी प्रजाती विपुल प्रमाणात विक्रीला उपलब्ध आहेत, मात्र मूळ भारतीय वनस्पती गायब आहेत.
वर्षानुवर्षे त्याने पक्षी संवर्धनासाठी केलेल्या प्रयत्नांमधून त्याला लक्षात आले होते की पक्षी (विशेषतः चिमण्या) आणि मूळ भारतीय वनस्पतींचा दिवसेंदिवस नाश होतोय.
दहा वर्षांनंतर नाशिक येथे त्यांनी ४०० देशी वनस्पतींनी समृद्ध अशी नर्सरी बघायला मिळत आहे. नेचर इंडिया नर्सरी या त्यांच्या संस्थेमार्फत महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये देशी वनस्पतींना जगविण्यासाठी आक्रमकरित्या प्रयत्न करण्यात आले आणि त्याला बहुतांश प्रमाणात यशही आले. त्यांनी २५ अर्बन फॉरेस्ट तयार केले आणि त्यात एकूण २० हजार एक भागात वनस्पतींची लागवड केली.

हॅमिलिया या परदेशी प्रजातीच्या एवजी वुडफोर्डिया फ्रुटिकोसा (हे फायर फ्लेम बुश नावाने ओळखले जाते), कॅसबेला थेवेटिया एवजी नेरीयम ओलेंडर अशा वनस्पती पुढे आणल्या. भारतात ३५ हजार पेक्षा जास्त मूळ देशी वनस्पती आहेत. पण त्या लोप पावत गेल्याने चिमणी, मधमाशी आदी पक्ष्यांच्या प्रजातींमध्येही घट झाली. कारण त्यांचा वावर असलेल्या वनस्पतीच नाहीशा झाल्या.
स्थानिक हवामान, मातीचे गुणधर्म आदींनुसार एखाद्या विशिष्ट्य प्रदेशात मूळ वनस्पती हजारो वर्षांपासून विकसित होत असतात. त्या निसर्गातील संतुलन राखण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावत असतात. पाने, स्टेम सॅप, अमृत, परागकण, फळे आणि बियाणे पुरवतात.
जेणेकरून फुलपाखरू, कीटक, पक्षी आदींसाठी ते अन्न म्हणून उपयोगात येत असते. जागरुकता आणि वैज्ञानिक ज्ञानाचा अभाव यामुळे सभोवतालच्या वनस्पतींकडे दुर्लक्ष झाले. त्याला प्लांट ब्लाईंडनेस असे म्हटले जाते. हे केवळ पर्यावरणासाठीच नाही तर माणसाच्या आरोग्यासाठीही धोकादायक ठरत असते., असे एका वनस्पती अधिकाऱ्याने म्हटले आहे.










