मुंबई ः कोणाचं नशीब केव्हा फळफळेल याशी शाश्वती आपण कधी देऊ शकत नाही. कठीण काळातही काही माणसं आपला प्रगतीचा आलेख चढाच ठेवतात. अशा व्यक्तिंमध्ये वॉरेन बफे यांचं नाव घेतलं जात आहे.
शेअर बाजारात गुंतवणूकदारांचे आदर्श गुंतवणूकदार वॉरेन बफे यांनी कोरोना काळात शेअर बाजारात गुंतवणूक करून मोठा नफा कमावला होता. त्यांनी तीन मोठ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यापैकी दोन कंपन्यांच्या गुंतवणुकीतून त्यांनी प्रचंड नफा कमावला आहे. दोन कंपन्यातून त्यांनी दोन महिन्यात तब्बल ६१ हजार कोटी कमावल्याची बाब समोर आली आहे.
वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीची अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये १८.८ टक्के गुंतवणूक आहे. तसंच बँक ऑफ अमेरिकामध्ये ११.९ टक्के गुंतवणूक आहे. या दोन गुंतवणुकीच्या माध्यमातून बफे यांना ६१ हजार कोटींचा फायदा झाला आहे.
वॉरेन बफे यांच्या बर्कशायर हाथवे कंपनीच्या अमेरिकन एक्स्प्रेसमध्ये १८.८ टक्के गुंतवणूक आहे. अमेरिकन एक्स्प्रेस अमेरिकेची मल्टिनॅशनल फायनान्शिअल सर्व्हिस कंपनी आहे.
डिसेंबर २०२०मध्ये वॉरेन बफे यांनी १२० कोटी डॉलरची गुंतवणूक केली होती. बर्कशायर हाथवे कंपनीची बँक ऑफ अमेरिक ११.९ टक्के गुंतवणूक आहे. ही गुंतवणूक बफे यांनी १४०० कोटी डॉलरमध्ये खरेदी केली होती. बँक ऑफ अमेरिका ही बफे यांची आवडती स्टॉक आहे.