नाशिक – महाराष्ट्राचे थोर शिल्पकार स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या 36व्या पुण्यतिथीच्या पुर्वसंध्येला सुप्रसिद्ध वक्ते डॉ. स्वप्निल छाया विलास चौधरी यांच्या ‘यशवंतगाथा’ या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्हद्वारे आयोजन करण्यात आले आहे.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई,विभागीय केंद्र नाशिक, विश्वास को-ऑप.बँक लि., नाशिक, सारस्वत बँक, विश्वास ज्ञानप्रबोधिनी अॅण्ड रिसर्च इन्स्टिट्यूट, नाशिक, व रेडिओ विश्वास 90.8 कम्युनिटी रेडिओ यांच्या संयुक्त विद्यमाने मंगळवार 24 नोव्हेंबर 2020 रोजी सायंकाळी 5.00 वाजता page@ycpnashik यावर हा कार्यक्रम सर्वांसाठी खुला असणार आहे.
स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या आयुष्यातील प्रेरणादायी घटनांची, संघर्षाची, तात्विक आचरणाची, साधेपणाची, सुसंस्कृत विवेकी विचारांच्या राजकारणी व्यक्तींची, हळव्या साहित्यिकाच्या जीवनाचा वेध घेणारी अनोखी कहाणी आहे.
यशवंतरावांचे जीवन विषयक चिंतन, विकासाविषयी दूरदृष्टी, बदलत्या राजकीय, सामाजिक बदलांविषयी विचारांचे दर्शन यातून घडते. यशवंतराव चव्हाणांच्या महाराष्ट्राच्या जडणघडणीसाठी दिलेले महत्त्वपूर्ण योगदान व विचारांचा ठेवा या माध्यमातून पोहोचण्यास मदत होणार आहे.
तरी जास्तीतजास्त संख्येने हा कार्यक्रम पाहण्याचे आवाहन संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कार्याध्यक्ष विश्वास ठाकूर, सचिव डॉ.कैलास कमोद, कोषाध्यक्ष डॉ.सुधीर संकलेचा, सदस्य सौ.कविता कर्डक, रऊफ पटेल, अॅड.नितीन ठाकरे, डॉ. स्मिता मालपुरे-वाकेकर, सौ. ज्योती पावरा यांनी केले आहे.