यंदा शनीचा मिथुन राशीवर राहणार असा प्रभाव
शनीच्या नक्षत्र बदलाचा शुभाशुभ प्रभाव अन्य राशींप्रमाणे मिथुन राशीवर देखील जाणार आहे. मिथुन राशी असलेल्यांना या कालावधीत शनीची अष्टम ढाय्या (अडीच) योगाचे शुभाशुभ परिणाम जाणवू शकतात. या कालावधीत मिथुन राशीच्या अष्टमात शनी अंतर्भूत असणार आहे. अष्टम स्थान हे अनेक नकारात्मक गोष्टींचे मूळ स्थान आहे. म्हणूनच पुढील गोष्टींची काळजी मिथुन राशी असलेल्यांनी घेणे आवश्यक आहे. कोणतेही चुकीचे कार्य आपल्या हातून घडू नये, याची काळजी घ्यावी. कोणाचे नुकसान होणार नाही, हे पाहावे. अतिआत्मविश्वास, चुकीचा निर्णय घेण्याची शक्यता, अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शनाअभावी मोठे आर्थिक निर्णय चुकण्याची शक्यता, वाहनापासून योग्य ती काळजी घेणे, मौल्यवान वस्तू जपणे, अनपेक्षित मोठा अनावश्यक खर्च अभ्यासपूर्ण पद्धतीने टाळणे, शिक्षण क्षेत्रातील यशस्वीतेसाठी अधिक प्रयत्नपूर्वक अभ्यास करणे, कर्ज परतफेडीचा योग्य तो अभ्यास करून कर्ज घेणे, शनीच्या विविध दृष्टी आपल्या शिक्षण कर्म धन स्थानावर येत असल्याने या सर्वच बाबतीत विशेष खबरदारी आवश्यक आहे. कौटुंबिक गैरसमज, भूमिका समजून न घेणे, शुभ कार्यात अनाकलनीय विलंब होऊ शकतो. मिथुन राशीवर लग्न नुसार शनीच्या प्रभावाचे मुख्य तीन प्रकार करता येतील. मेष, कर्क, तूळ, मकर आणि वृषभ लग्नेश असलेल्या मिथुन राशी असलेल्यांना शनीचा प्रभाव विशेष जाणवणार नाही. कन्या, धनु, मीन, लग्नेश असणाऱ्या मिथुन राशी असलेल्यांना शुभाशुभ परिणाम संमिश्रपणे जाणवतील, तर मिथुन, सिंह, वृश्चिक आणि कुंभ लग्न असणाऱ्या मिथुन राशी असलेल्यांना वरील सर्वच बाबतीत विशेष खबरदारी घ्यावी लागणार आहे.
अशी असतील शनीची शुभ फले
अभ्यास पूर्ण पद्धतीने केलेली गुंतवणूक लाभदायी ठरेल. त्या त्या क्षेत्रातील योग्य त्या अनुभवी व्यक्तींचा सल्ला हा अनावश्यक खर्चापासून वाचवेल. छोट्या गुंतवणुकीचे फायदे मिळतील. शॉर्टकट, फायदा मिळवण्याचा मोह टाळावा. विलंब झालेली शुभ कार्ये चतुराईने पार पाडावीत. स्वतः सर्व निर्णय घेण्याचा अट्टाहास नको.
या लेखमालेत आपण उद्या पुढील रास बघू
शंकासमाधान
ज्योतिष, वास्तू, विषयक प्रश्न पाठवतांना आपले नाव, जन्मतारीख, जन्मवेळ AM or PM, जन्मगाव, तालुका तसेच जिल्हा यांचा उल्लेख करावा. प्रश्न 9373913484 या WhatsApp नंबरवर पाठवावे.