मुंबई – जॉन अब्राहमचे या नवीन वर्षात तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. आणि हे तीनही चित्रपट ऍक्शन मूव्हीज आहेत. या चित्रपटांमुळे बॉक्स ऑफिसवर जॉन सलमान खान आणि अर्जुन कपूरला टक्कर देणार आहे.
जॉन अब्राहमच्या ‘मुंबई सागा’ हा चित्रपट प्रदर्शित होण्याची तारीख नुकतीच जाहीर करण्यात आली. जॉनने देखील ट्विट करून याची माहिती दिली. यासोबत त्याने चित्रपटाचे पोस्टरही शेअर केले आहे. यात जॉन दोन्ही हातात मशीनगन घेऊन पाठमोरा उभा आहे. आणि पोस्टरवर म्हटले आहे की, बॉम्बेची मुंबई होण्याची सत्यकथा. या चित्रपटात जॉनसोबत सुनील शेट्टी, इमरान हाश्मी, काजल अग्रवाल, महेश मांजरेकर, प्रतीक बब्बर, रोहित रॉय, शाद रंधावा, अंजना सुखानी आदी कलाकार असून संजय गुप्ता याचे दिग्दर्शक आहेत.
‘मुंबई सागा’ 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. याच दिवशी अर्जुन कपूर आणि परिणती चोप्राचा ‘संदीप और पिंकी फरार’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाची निर्मिती यशराज बॅनर्सची आहे.
https://twitter.com/TheJohnAbraham/status/1364100256497999874