परतीच्या पावसाने खरीप हंगामाची उडाली दाणादाण ; आता शेतकर्यांच्या आशा रब्बीवर
नाशिक : जिल्ह्यात यंदा ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे सर्वच धरणांमध्ये सुमारे ९५ टक्के पाणीसाठा असून ११ धरणे शंभर टक्के भरली आहेत . तर नाशिककरांची वर्षभर तहान भागविणाऱ्या गंगापूर धरण समूहातील गंगापूर आणि आळंदी हे दोन धरणे शंभर टक्के भरली तर गौतमी गोदावरी ९७ टक्के व काश्यपी ७५ टक्के भरले आहे. सप्टेंबर अखेर आता परतीच्या पावसाने उघडीप उघडीप दिल्याने पावसाळा संपला असल्याचे बोलले जात आहे.
यंदा जून महिन्यात पावसाची चांगली सुरुवात झाली होती .त्यानंतर जुलै पावसाने उघडीप दिल्याने नाशिककरांना पाणीटंचाईचे संकट निर्माण झाले होते. कारण पावसाळा अर्ध्यावर संपला तरी गंगापूर धरणात निम्म्यापेक्षा कमी पाणीसाठा होता. मात्र त्यानंतर ऑगस्ट आणि सप्टेंबर मध्ये जोरदार पाऊस झाल्याने दारणा, गंगापूरसह २४ धरणे १०० टक्के भरली. जिल्ह्यातील सर्वात मोठे गिरणा धरण देखील शंभर टक्के भरले आहे, त्यामुळे मालेगाव सह जळगाव जिल्ह्यातील पिण्याच्या तसेच सिंचनाच्या पाणीप्रश्न मिटला. तर इकडे दारणा आणि गंगापूर धरणातून सातत्याने पूर पाणी गेल्याने मराठवाडयातील सर्वात मोठे जायकवाडी धरण देखील पूर्ण क्षमतेने भरल्याने धरणाचे सर्व दरवाजे उघडवे लागले होते.
दरम्यान, जिल्ह्यातील भावली , भाम, वालदेवी, माणिकपुंज, कडवा,तिसगाव, भोजापुर, हरणबारी, केळझर, नागासाक्या, चणकापूर आदि धरणे शंभर टक्के भरली आहेत. त्यामुळे अनेक तालुक्यातील पिण्याच्या पाण्याचा तसेच रब्बी पिकांसाठी सिंचनाचा प्रश्र मिटला आहे. कारण यंदा येवला, नांदगाव ,चांदवड, सिन्नर, निफाड आदी भागात सप्टेंबरच्या अखेरीस जोरदार पावसामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अनेक द्राक्षबाग भुईसपाट झाल्या .तसेच अन्य खरीप पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे .आता शेतकऱ्यांच्या आशा रब्बी पिकावरच आहेत.
त्याचप्रमाणे यंदा अन्य धरणांमध्ये करंजवण ९१ टक्के, वाघाड ९७ टक्के ,ओझरखेडा ८० टक्के, पुणेगाव ९७ टक्के, मुकणे ८० टक्के, नांदूर मधमेश्वर ९० टक्के भरली आहेत.मात्र परतीच्या पावसामुळे बागलाण तालुक्यातील तळवाडे भामेर येथील धरण पंचवीस वर्षांनंतर प्रथमच पूर्ण क्षमतेने भरल्याने आनंद व्यक्त होत असताना धर त्याला गळती लागली असून धरण फुटण्याची शक्यता वर्तविली जात होती .त्यानंतर सदर घटना लक्षात येताच स्थानिक नागरिकांनी तत्काळ वरिष्ठ अधिकाऱ्याशी संपर्क साधला याची दाखल घेऊन या ठिकाणी स्थानिक लोकप्रतिनिधींनी देखील भेट दिली असून धरणाच्या डागडुजी करण्याचे काम सुरू आहे. तसेच मालेगाव तालुक्यातील वळवाडे नजीक उत्तरेला असलेली कमदारा हे धरण देखील फुटल्याने परिसरात शेतामध्ये पाणी शिरून उभ्या पिकाचे नुकसान झाले होते . त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाने मदत करावी अशी मागणी होत आहे.