नाशिक – म. वि. प्र समाजाच्या समाजकार्य महाविद्यालय व अर्पण एनजीओ, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने ‘बाल लैंगिक शोषण’ विषयावर आधारित एकदिवसीय वेबिनार आयोजन करण्यात आले होते. शालेय वयात विद्यार्थ्यांना लैगिंग शोषण सारख्या विषयांची माहिती व विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता यावी यासाठी वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. यात लैंगिक अत्याचारापासून मुक्तता, वैयक्तिक सुरक्षा, ऑनलाइन सुरक्षा तसेच पोक्सो कायदा या विषयांवर माहिती देण्यात आली. लैंगिक अत्याचाराच्या समस्या व तत्सम प्रश्न दिवसेंदिवस समोर येत असतांना त्याविषयी विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी वेबिनार आयोजित केल्याचे आयोजकांनी सांगितले. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पहता शाळा बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण सुरु आहे. अभ्यासक्रमासोबत विद्यार्थ्यांना विविध विषयांची माहिती व्हावी यासाठी निरनिराळ्या आशयाच्या विषयांवरील मार्गदर्शन फायदेशीर ठरणार आहे. यात श्रद्धा जाधव, शुभांगी शिंदे व दिपाली कदम या तज्ज्ञांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी कॉलेजचे प्राचार्य डॉ. विलास देशमुख तसेच संयोजिका प्रा. सुनिता जगताप उपस्थित होत्या. हा वेबिनार समाजकार्याच्या क्षेत्रात कार्यरत विद्यार्थ्यांसाठी व कार्यकर्त्यांसाठी अतिशय उपयुक्त ठरणारा आहे. व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे मार्गदर्शन करण्यात आले. यासाठी प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.