दिंडोरी :- तालुक्यातील म्हेळूस्के येथील ग्रामपंचायतच्या सरपंचपदी योगिता राजेंद्र बर्डे तर उपसरपंचपदी योगेश माधवराव बर्डे यांची निवड झाली आहे.
सरपंच पदासाठी योगिता राजेंद्र बर्डे तर उपसरपंच पदासाठी योगेश माधवराव बर्डे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाला. त्यामुळे निवडणूक निर्णय अधिकारी पी. डी. चौरे यांनी निवडणूक बिनविरोध झाल्याचे जाहिर केले. यावेळी गुलालाची उधळण करण्यात आली तर फटाक्यांची आतषबाजी देखील करण्यात आली. यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक आगळे यांनी काम पाहिले. यावेळी सदस्य हिरामन गांगोडे, सुनील गांगुर्डे, पुनाबाई गांगोडे, मुक्ता वायकंडे यांचेसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.