मुंबई – बॉलीवूड नटांची लग्न आणि घटस्फोट सहसा लपत नाहीत. दोन्हींची चर्चा जोरात असते. मात्र कुठल्याही वादात न राहणारा अभिनेता आणि खासदार सनी देओल याने आपल्या लग्नाची माहिती सर्वांपासून लपवली होती. त्याच्या लग्नाबाबत केवळ कुटुंबियांनाच माहिती होते.
१९८३ मध्ये ‘जब हम जवाँ होंगे’ आणि ‘बादल यू गरजता है’ या दोन गाण्यांनी तसेच सनी देओल व अमृता सिंगच्या रोमांसने प्रेक्षकांना घायाळ करून सोडले होते. निमित्त होते सूपरडूपर हीट ‘बेताब’ या चित्रपटाचे. जोडी हीट झाली आणि रोमांसही. प्रत्यक्ष आयुष्यातही दोघांमध्ये अफेयर सुरू झाले. पण अमृताच्या आईला जोडी मान्य नव्हती. या अफेअरची चर्चा मात्र चांगलीच रंगली होती. काही दिवसांतच सनी देओलने पुजा या तरुणीशी विवाह केला. बॉलीवडूला आणि चाहत्यांना बरीच वर्षे सनी देओलची बायको कोण आहे, हेच माहिती नव्हते. सनीचा मुलगा करण सिनेमात आला, पण बायकोला कुणीही ओळखत नाहीत. मुळात अनेक अभिनेत्यांचे करियर nग्नानंतर उध्वस्त झाले आहे, त्यामुळे सनीच्या लग्नाबाबत कुणालाही सांगायचे नाही आणि जास्त चर्चाही करायची नाही, असा निर्णय देओल कुटुंबियांनी घेतला होता. त्यामुळेच पुजा देओलबाबत कुणालाच फारशी माहिती नाही. ती भारतासह ब्रिटनचीही नागरीक असल्याचे मात्र कळते. अमृता सिंग करिअरच्या पहिल्याच चित्रपटादरम्यान प्रेमात पडली होती. त्यामुळे हे अफेअर पुढे फार काळ चर्चेत राहिले नाही.