मुंबई – बॉलिवुडच्या पार्ट्या नेहमीच चर्चेचा विषय असतात. कधी कधी या पार्टीज मध्ये जुने वैमनस्य मिटवून कलाकार पुन्हा एकत्र येतात तर कधीकधी जवळची नातीही दुरावतात. असेच एक दोस्तीचे नाते काही वर्षांपूर्वी कॅटरिना कैफच्या वाढदिवसाच्या पार्टीत तुटले आणि त्यानंतर ते नाते पुन्हा जुळायला कित्येक वर्ष लागली. हे नाते होते सलमान खान आणि शाहरुख खान यांच्यातील मैत्रीचे.
बॉलिवुडचे हे दोन महानायक जेव्हा एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले तेव्हा सगळ्यांनाच धक्का बसला. सलमान आणि शाहरुख यांच्यात झालेल्या कडाक्याच्या भांडणावर अनेकांनी पडदा टाकून पाहिला, मात्र बिघडलेले हे सूर अनेक वर्षांपर्यंत तसेच राहिले.
मुळात २००२ साली या विवादाची सुरुवात झाली. त्यावेळी ऐश्वर्या राय आणि सलमान खान यांच्यातील नात्यात कटुता निर्माण झाली होती. एक दिवस शाहरुखच्या ‘चलते चालते’ चित्रपटाच्या सेटवर येऊन सलमानने तमाशा केला. शाहरुखने बरेच समजावल्या नतरही सलमानने त्याचे म्हणणे ऐकले नाही. शेवटी शाहरुखने या चित्रपटातून ऐश्वर्याला काढून तिच्या जागी राणी मुखर्जीला कास्ट केले.
या घटनेनंतरच सलमान आणि शाहरुख यांच्या नात्यात दुरावा वाढला. त्यानंतर १६ जुलै २००८ या दिवशी कॅत्रिना कैफच्या वाढदिवसाच्या दिवशी सलमान आणि शाहरुख एकत्र आले. सुरुवातीला त्यांनी एकमेकांबरोबर थट्टा मस्करी करणे सुरु केले, मात्र लवकरच याचे पर्यावसान गंभीर बाचाबाची आणि भांडणात झाले. त्यानंतर दोघांनी एकमेकांशी बोलणेसुद्धा बंद केले.
शाहरुख आणि सलमान यांच्यामधील हे शत्रुत्त्व सलमानची बहिण अर्पिता खान हिच्या लग्नाच्या वेळी संपुष्टात आले. अर्पिताच्या लग्नाच्या संगीत सोहळ्यात शाहरुखने भाग घेतला, आणि रिसेप्शनमध्ये सुद्धा घरच्या व्यक्तीप्रमाणे आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. यानंतर सलमान आणि शाहरुख पुन्हा मित्र झाले आहेत.