चेन्नई – तामिळनाडूमध्ये विधानसभा निवडणुकांच्या घोषणा झाल्यानंतर राजकीय नेत्यांच्या आरोपांच्या फैरी झडत आहेत. काँग्रेसचे नेते सध्या तामिळनाडू दौऱ्यावर असून, त्यांनी तेथील मुख्यमंत्र्यावर टीका केली आहे. तसंच केंद्रातल्या नरेंद्र मोदी सरकारवरही निशाणा साधला आहे.
मला रात्री फक्त ३० सेकंदामध्ये झोप लागते, कारण मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मोदींना वाटतं की, ते तामिळनाडूमधल्या लोकांना नियंत्रणात ठेवू शकतात. मात्र आता हेच लोक रिमोटमधील बॅटरी काढून ती फेकून देणार आहेत, असा हल्लाबोल राहुल गांधी यांनी केला.
मला रात्री फक्त ३० सेकंदात झोप लागते. कारण मी नरेंद्र मोदी यांना घाबरत नाही. मात्र तामिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांना झोप लागायला किती वेळ लागत असेल. त्यांना रात्री झोपच लागत नसेल, कारण ते प्रामाणिक नाहीत. जे असा विचार करतात की, आपण तामिळनाडूच्या लोकांना हवं तसं हाताळू शकतो. कारण तिथला मुख्यमंत्री भ्रष्टाचारी आहे, असा हल्लाबोल त्यांनी मुख्यमंत्री पलानीस्वामी यांच्यावर केला.
नरेंद्र मोदी यांना वाटतं, की तामिळनाडू त्यांच्यासाठी एका टीव्ही रिमोट कंट्रोलप्रमाणे आहे. हा रिमोट हातात घेऊन ते हवं ते करू शकतात. त्यांनी आवाज वाढवताच मुख्यमंत्रीसुद्धा जोरजोराने बोलू लागतात. त्यामुळे मोदींना वाटतं ते लोकांना कंट्रोल करू शकतात. मात्र आता हेच लोक रिमोटमधली बॅटरी काढून फेकून देणार आहेत, असा टोला राहुल गांधी यांनी लगावला.