मुंबई – ‘मुन्नाभाई एमबीबीएस’ आणि ‘लगे रहो मुन्नाभाई’ या दोन सुपरहिट चित्रपटांनंतर मुन्नाभाई ३ ची देखील प्रेक्षक आतुरतेने वाट पहात होते. मात्र, हा चित्रपट तयार होऊन तो प्रदर्शित होणे जरा कठीणच असल्याचे अभिनेता अर्शद वारसी याचे म्हणणे आहे. संजय दत्त सोबतच अर्शद वारसी हा या कथेतील एक प्रमुख पात्र आहे.
हे सांगतानाच त्याने आपल्या चाहत्यांना सांगितले की, तुम्हाला जर याची पुढची कथा पहायची उत्सुकता असेल तर हा चित्रपट बनवण्यासाठी तुम्हीच राजकुमार हिरानी आणि विधू विनोद चोप्रा या दोघांच्या मागे लागा. त्यामुळे तरी ते हा चित्रपट तयार करतील. अर्थात हे सारे त्याने गंमतीत सांगितले आहे. चाहते जरी घरी गेले तरी काही घडेल असं मला वाटत नाही. कारण खूप काळ लोटला आहे. आणि राजकुमार हिरानी यांच्या हातात दुसरा प्रोजेक्ट आहे.
अर्शद लवकरच ‘दुर्गामती’ या चित्रपटात दिसणार आहे. ११ डिसेंबरला हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार आहे. यात त्याच्यासोबत भूमी पेडणेकरची प्रमुख भूमिका आहे.