नवी दिल्ली – फायबर ऑप्टिक हा शब्द ऐकल्याबरोबर आपल्या हाय-स्पीड इंटरनेट केबलची संकल्पना आपल्या डोळ्यासमोर येते. फायबर ऑप्टिक्स तंत्रज्ञानाचा शोध घेऊन जगात संवाद क्रांतीचा पाया रचणार्या प्रो. नरिंदरसिंग कपानी यांच्या कर्तृत्वाचा आपल्या देशाने गौरव केला असून भारताच्या दुसर्या सर्वोच्च नागरी सन्मान समजल्या जाणाऱ्या पद्मविभूषण (मरणोत्तर) पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
‘फादर ऑफ ऑप्टिक्स’ म्हणून ओळखल्या जाणार्या प्रा. कपानी यांचा जन्म पंजाबच्या मोगा येथे ३१ ऑक्टोबर १९२६ रोजी झाला असून गेल्या महिन्यातच ४ डिसेंबर २०२० रोजी अमेरिकेत निधन झाले. संगणकाशी संबंधित अनेक गोष्टी परदेशात शोधल्या गेल्या आहेत, परंतु फायबर ऑप्टिक्स याचा शोध लावणारे भारतीय प्रा. कपानी यांचे उच्च शिक्षण परदेशात झाले. कपनी यांच्या संशोधनांमध्ये फायबर-ऑप्टिक्स संप्रेषण, लेसर, बायोमेडिकल इन्स्ट्रुमेंटेशन, सौर उर्जा आणि प्रदूषण देखरेखीचा समावेश आहे. त्यांच्याकडे शंभराहून अधिक पेटंट्स आहेत आणि ते काही वर्ष राष्ट्रीय शोधक मंडळाचे सदस्य होते.
फॉर्च्युन मासिकाने १९९९ मध्ये जगातील सात ‘अनसंग हीरोज’ मध्ये निवडलेल्या प्रो. कपनी यांनी आग्रा विद्यापीठातून पदवी संपादन केली. त्यानंतर त्यांनी लंडनच्या इम्पीरियल कॉलेजमध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले. तसेच तेथून त्यांनी डॉक्टरेट मिळविली. इंडियन ऑर्डनन्स फॅक्टरी सर्व्हिसचे अधिकारी म्हणून आपल्या कारकीर्दीची सुरुवात करणारे कपाणी सुमारे ४५ वर्षांपूर्वी अमेरिकेत गेले होते, जिथे त्यांची गणना जगातील प्रमुख भौतिकशास्त्रज्ञांमध्ये केली जाते.
इम्पीरियल कॉलेजमध्ये शिकत असताना, प्रा. कपनी यांनी हॅरोल्ड हॉपकिन्ससोबत फायबरद्वारे संक्रमणा संदर्भात काम केले. १९५३ मध्ये त्याच वेळी, त्यांनी पहिल्यांदा ऑप्टिकल फायबरद्वारे दुसर्या ठिकाणी फोटो पाठविण्याचा विक्रम केला. त्यानंतर १९५४ मध्ये फायबर ऑप्टिक्स तंत्रज्ञानाच्या रूपात जगासमोर आले. १९६० मध्ये कपाणी यांनी सायंटिफिक अमेरिकेच्या लेखात जगाला प्रथम ‘फायबर ऑप्टिक्स’ हा शब्द दिला. कपनी यांना नोबेल पुरस्कारासाठीही नामांकन देण्यात आले होते. फॉर्च्युन मासिकाने जगातील दहा सर्वात प्रभावी व्यक्तींमध्येही त्यांचा समावेश केला होता.
काही काळ ते अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठात प्राध्यापक होते. परदेशात असताना त्यांनी लवचिक काचातून प्रकाश कसा पाठवायचा यावर ते संशोधन करीत होते. कपनी यांनी ‘हॅरोल्ड हॉपकिन्स्ट’ या वैज्ञानिकांसोबत संशोधन व अभ्यास करण्यास सुरवात केली आणि १९५२ मध्ये प्रथम एका जर्नलमध्ये त्यांचा शोध जाहीर केला. डॉ. कपाणी यांनी ऑप्टिकल फायबरच्या क्षेत्रात उत्तम काम केले आहे. म्हणून प्रा. कपानी यांना पद्मविभुषण पुरस्कार जाहीर केला आहे.