लखनऊ – येथील शाळा उघडल्यानंतर एक युवक शाळेच्या गेटजवळ उभा राहायचा, मुलींचा पाठलाग करायचा आणि त्यांना त्रास देत होता, यामुळे एका मुलीने तिच्या वडिलांकडे तक्रार केली. त्यामुळे रागाच्या भरात या युवकाने इंटर कॉलेजच्या विद्यार्थीनींचा व्हॉट्सअॅप ग्रुप हॅक केला. आणि त्यानंतर व्हॉट्सअॅप ग्रुपचे सर्व मोबाइल नंबर सोशल मीडियावरील डर्टी ग्रुपवर टाकण्यात आल्यामुळे त्या मुलींना अश्लिल मॅसेज आणि अश्लिल कॉल येऊ लागले. मुलींच्या वडिलांच्या फिर्यादीवरून आरोपी सौरभ सिंगविरोधात तक्रार दाखल केली आणि त्याला अटक केली.
पोलीस निरीक्षक आलोक कुमार राय म्हणाले की, सुमारे १५ दिवसांपूर्वी सौरभने परिसरातील इंटर कॉलेजच्या विद्यार्थ्यांच्या व्हॉट्सअॅप ग्रुपला हॅक केले होते. त्यात सुमारे १८ ते १९ संख्या होती. सौरभने सर्व फोननंबर अश्लिल गटावर टाकले. कारण शाळा उघडल्यानंतर तो शाळेच्या गेटजवळ उभा राहून मुलींना त्रास देत होता. नुकतीच एका मुलीने तिच्या वडिलांकडे तक्रार केली. यानंतर वडिलांनी तहरीरवर गुन्हा दाखल केला. आरोपी सौरभसिंग पवनपुरी तेलीबाग येथील रहिवासी आहे. त्याला मोबाईल लोकेशनच्या आधारे पोलिसांनी अटक केली असून व्हॉट्सअॅपवर अशोभनीय मेसेज आल्यावर अनेक विद्यार्थ्यानीं सौरभला फोन करून निषेध केला.
दरम्यान, या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झाले आङे की व्हॉटसअॅप हे सुरक्षित नसून ते हॅक होते.