नाशिक – शहरासह जिल्ह्यात शनिवार आणि रविवारच्या लॉकडाऊनला प्रारंभ झाला आहे. पहिल्याच दिवशी उत्स्फुर्त प्रतिसाद लाभल्याने जिल्हाधिकारी सूरज मांढरे हे भारावून गेले आहेत. त्यामुळे त्यांनी नाशिककरांचे आभार मानले आहेत.
जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या संदेशात म्हटले आहे की,
आज नागरिकांनी खूप छान प्रतिसाद दिला. सर्वांच्या एकजुटीतूनच या संकटाचा मुकाबला केला जाऊ शकतो याची सार्वत्रिक जाणीव होणे ही या संकटावर मात करण्याचे दृष्टीने निर्णायक गोष्ट आहे. सर्व नागरिकांचे, व्यावसायिकांचे व आज या लढ्यात उतरलेल्या सर्वांचेच मनःपूर्वक आभार.
तुम साथ हो जब अपने, दुनिया को दिखा देंगे
हम मौत को जीने के, अंदाज़ सिखा देंगे…
– सूरज मांढरे, जिल्हाधिकारी, नाशिक