नाशिक – शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पालकमंत्री छगन भुजबळ यांची अचानक शनिवारी सायंकाळी भेट घेतली. त्यामुळे या भेटीवरुन सर्वत्र तर्कवितर्क लढविले जात होते. या भेटीत नक्की काय झाले याचा खुलासा अखेर राऊत यांनी आज झालेल्या पत्रकार परिषदेत केला आहे.
राऊत यांनी सांगितले की, नाशिक सिटी बससेवेचा निर्णय येत्या दाेन दिवसात हाेण्याची शक्यता आहे. पालकमंत्री भुजबळ यांच्याशी याबाबत चर्चा झाली आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशीही दूरध्वनीवरून याबाबत चर्चा करण्यात आली आहे. बससेवा हा लाेकांच्या जिव्हाळ्याचा विषय असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार निधीबाबत बोलतांना राऊत म्हणाले की, शिवसेना आमदारांना निधी मिळत नसल्याच्या काही तक्रारी हाेत्या. याबाबत पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याशी चर्चा करण्यात आली आहे. याेग्य ताे मार्ग निघेल. आमदार निधी हा मतदारसंघाच्या विकासासाठी असताे. त्यामुळे यात पक्षीय मतभेद बाजूला असायला हवेत, असे आमचे मत आहे. शहर विकासासाठी आमदारांना याेग्य ताे निधी उपलब्ध हाेईल, यात शंका नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासर्व प्रश्नांबाबत भुजबळ यांच्याशी चर्चा झाल्याचेही राऊत यांनी सांगितले आहे.