मुंबई – चित्रपटगृहे तर सुरु झाली पण तिथे प्रेक्षकांना आणणे हे मोठे जिकिरीचे काम आहे. यासाठीच्या प्रयत्नांमध्ये सिनेअभिनेते देखील सहभागी होत आहेत. याचाच एक भाग म्हणून मंगळवारी संध्याकाळी आमिर खान मुलगी इरा हिच्यासोबत चित्रपट पाहायला सिनेमागृहात गेला होता.
जुहू भागातील आपल्या घराजवळील पीव्हीआर चित्रपटगृहात जाऊन आमिर खान यांनी ‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट पहिला. त्याआधी आपण जाणार असल्याची सूचना त्यांनी ट्विटरद्वारे चाहत्यांना दिली होती. बऱ्याच काळाने चित्रपटगृहात जाण्याचा आनंद होत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
‘सूरज पे मंगल भारी’ हा चित्रपट रोमँटिक – कॉमेडीपट आहे. यात मॅनेज वाजपेयी वेडिंग डिटेक्टीव्हची भूमिका साकारली आहे. चित्रपटगृह सुरु झाल्याने तसेच आमीर खान याने त्यास सपोर्ट केल्याने मनोज वाजपेयीने त्याचेही आभार मानले आहेत.
आमीर खानच्या खानच्या चित्रपटांचा विचार केला तर त्याचा ‘लाल सिंह चड्ढा’ हा चित्रपट नाताळच्या मुहूर्तावर रिलीज होणार होता. पण आता या चित्रपटाचे प्रदर्शन पुढच्यावर्षी ख्रि समसपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन घोषित केल्याने चित्रपटगृह बंद करण्यात आली होती. यामुळे अनेक चित्रपटांचे प्रदर्शन पुढे ढकलण्यात आले आहे किंवा मग काही चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. यंदा रखडलेले सगळे चित्रपट २०२१ मध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सध्या सुरु आहे.