नवी दिल्ली – ई-कॉमर्स मध्ये प्रसिद्ध असलेल्या अॅमेझॉन कंपनीला मोठ्या वादामुळे आपला लोगो बदलावा लागला. कारण एक महिन्यापूर्वी तयार केलेल्या अॅमेझॉनच्या नव्या लोगोला लोकांकडून नकारात्मक प्रतिक्रिया मिळत होती. यानंतर अॅमेझॉनने अखेर आपल्या अॅपचा लोगो बदलण्याचा निर्णय घेतला.
अॅमेझॉनचा नवीन लोगो २५ जानेवारी रोजी लाँच झाला होता, मात्र अॅमेझॉनच्या नवीन लोगोला लॉन्च झाल्यापासून टीकेचा सामना करावा लागला आहे. अशा परिस्थितीत कंपनीने सुमारे एक महिनभर टीका ऐकल्यानंतर लोगो बदलण्याचा निर्णय घेतली आहे. कारण अॅमेझॉनच्या लोगोमध्ये कार्डबोर्डच्या वरच्या बाजूला निळ्या रंगाची एक टेप दिसत असून त्याच्या खाली स्वाक्षरी शैलीचे स्मित होते.
अॅमेझॉनच्या नवीन लोगोची तुलना सोशल मीडियावरील हिटलरच्या मिशाशी केली गेली. तसेच अॅमेझॉनचा नवा लोगो लोकांसमोर हिटलरच्या चेहर्याची आठवण करुन देणारा होता, असे काही लोकांचे म्हणणे आहे, यामुळे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर अॅमेझॉनला जोरदार ट्रोल केले गेले. वाढता विरोध पाहून कंपनीने पुन्हा एकदा आपला लोगो बदलला आहे.
अॅमेझॉनने आता नवीन चिन्ह लाँच केले आहे, ज्याची पार्श्वभूमी पूर्वीसारखी पिवळी आहे. त्यावरही एक हास्य ठेवण्यात आले आहे. परंतु त्याच्या वरच्या टेपची शैली बदलली आहे. म्हणजे निळा रंगाचा टेप तळाशी फिक्कट असतो. हा बदल झाल्यावर लोगो हिटलरच्या मिशासारखे दिसणार नाही, असा कंपनीचा विश्वास आहे.