मुंबई – अभिनेता अक्षय खन्ना हा इंडस्ट्रीतला एक गुणी अभिनेता. त्याचं काम हीच त्याची ओळख आहे. त्याचे वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिले आहे. अक्षय आणि करिष्मा यांचे लग्न होता होता राहिले.
दिवंगत ज्येष्ठ अभिनेता विनोद खन्ना यांचा अक्षय हा मुलगा आहे. त्याने १९९७ मध्ये ‘हिमालय पुत्र’ या चित्रपटाद्वारे इंडस्ट्रीत पदार्पण केले. अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत त्याचे लग्न होणार होते. पण काही कारणाने ते झाले नाही. आजवर अक्षय खन्नाने लग्न केलेले नाही.
हिमालय पुत्र पासून सुरुवात झाली असली तरी अक्षयचा दुसरा चित्रपट ‘बॉर्डर’ हिट झाला. तर ‘ताल’ चित्रपटापासून त्याला ओळख मिळाली. १९९९ मध्ये आलेला हा चित्रपट अक्षयसाठी लकी ठरला. ऐश्वर्या रॉय सोबतची त्याची केमिस्ट्री सर्वाना भावली. शिवाय चित्रपटही सुपरहिट झाला. त्यानंतर आलेल्या ‘दिल चाहता है’ ने त्याला सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळवून दिला. याशिवाय त्याने हमराज, हंगामा, हलचल, रेस आणि दहक आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे.










