नवी दिल्ली – म्यानमारमधील लोकशाही सरकार उलथून टाकणाऱ्या संरक्षण दलाचे मुख्य सेनापती (लष्करप्रमुख) सीनियर जनरल मीन ओंग हेनिंग यांनी आता स्वतः सत्ता स्वीकारल्यानंतर देशात आणीबाणी लागू करणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे.
मागील वर्षा नोहेंबरमध्ये निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर धांदल उडाल्यामुळे त्यांनी देशात आणीबाणी लागू केली होती. परंतु अनेक लोकांचा असा विश्वास वाटत आहे की, जर पुन्हा निवडणूकीची घोषणा केली तर हेनिंग यांचा सामना आंग संग सू की यांची पार्टी नॅशनल लीग फॉर डेमोक्रॅसी विरुद्ध होईल आणि यात पुन्हा लोकशाहीचा विजय होईल.
नवीन राज्य प्रशासकीय परिषद स्थापनेनंतर हेनिंग यांनी देशाची सत्ता हाती घेतली. त्यांच्या कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की सैन्य पुरस्कृत केलेल्या घटनेच्या नुसारच ही परिषद स्थापन करण्यात आली आहे. या अंतर्गत, कमांडर इन चीफ ऑफ डिफेन्स सर्व्हिसच्या हातात सर्वोच्च सामर्थ्य आहे. या परिषदेत 11 सदस्य आहेत, ज्यात हेनिंगचा समावेश आहे, हे सर्व सैन्याचे वरिष्ठ अधिकारी आहेत.
तसेच सर्व प्रकारच्या निर्णय घेण्याचा अधिकार फक्त राज्य प्रशासकीय समितीला आहे. ब्रुसेल्सच्या आंतरराष्ट्रीय क्रिसिस ग्रुपच्या तज्ज्ञांचे मत असे आहे की, लष्करी बंडखोरीनंतर लोकशाहीला मोठा धक्का बसला असून जर याची दुरुस्ती केली गेली नाही, तर त्यामुळे देश जबरदस्तीने हिंसेच्या दिशेने जाऊ शकतो.
दरम्यान, नागरिकांची निदर्शने सुरू झाल्याने देशात फेसबुकवर बंदी घालण्यात आली आहे. याचेही मोठे पडसाद देशात उमटत आहेत.