नवी दिल्ली/अम्मान – जगातील अनेक देशांमध्ये लोकशाही शासन व्यवस्था असली तरी अद्यापही काही देशांमध्ये राजेशाही आहे. त्यामुळे या ठिकाणी वारंवार तीव्र राजकीय संघर्ष आणि सत्ताबदल सुरूच असतो. म्यानमार नंतर आता जॉर्डन मध्येही लष्करी उठाव झाला असून येथील राजपुत्राला नजर कैदेत ठेवण्यात आले आहे.
जॉर्डन या देशांमध्ये राजघराण्याचे राज्य आहे. सध्या जॉर्डनच्या राजघराण्याला अनेक समस्यांना तोंड दयावे लागत आहे. म्यानमारमधील लष्करी हल्ल्यानंतर आता जॉर्डनच्या सैन्याने देखील प्रिन्स हमजा याला नाट्यमयरित्या ताब्यात घेतले असून त्याला नजरकैदेत ठेवण्यात आले होते. त्यामुळे जॉर्डनमधील राजकीय अस्थिरतेबद्दल अमेरिकेला चिंता व्यक्त केली आहे.
प्रिन्स हमजा कोण आहे?
हमजा हा जॉर्डनचा दिवंगत किंग (राजा) हुसेन आणि त्याची पत्नी क्वीन (राणी) नूर यांचा मोठा मुलगा आहे. स्वर्गीय राजा हुसेन यांना तो खूप प्रिय होता म्हणून त्याने हमजा याला १९९९ मध्ये जॉर्डनचा क्राउन ऑफ प्रिन्स हमजा ही पदवी देण्यात आली. परंतु जेव्हा तो राजा हुसेनचा उत्तराधिकारी बनला, तेव्हा विविध प्रश्न देखील उपस्थित केले गेले. यानंतर राजा अब्दुल्ला यांनी जॉर्डनचे सिंहासन काबीज केले. त्यानंतर २००४ मध्ये अब्दुल्लाने हमजाचा मुकुट आणि प्रिन्स ही पदवी परत घेतली.










