यांगून – म्यानमारमधील विविध भागात जुलमी लष्करी शासनाविरोधात निषेध करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी गोळीबार केला. या दुर्घटनेत १८ नागरिक ठार झाले असून ३० पेक्षा जास्त लोक जखमी झाले. संयुक्त राष्ट्रात म्यानमार सैन्याविरोधात आवाज उठविणार्या म्यानमारचे राजदूत केवा मो तुन यांना हटविण्यात आले आहे.
संयुक्त राष्ट्रांच्या मानवी हक्क कार्यालयाने आंदोलकांच्या हत्येच्या घटनेबद्दल शोक व्यक्त करतांना पोलिसांच्या या कारवाईचा तीव्र निषेध केला आहे, तसेच शांततावादी मार्गाने निषेध करणार्या लोकांवर गोळबार करणाऱ्या पोलिसांवर कारवाईची मागणी केली. त्यांनी सैन्यदलाविरोधात कठोर कारवाईची मागणी करत तातडीने लोकशाही व्यवस्था पूर्ववत करण्याचे आवाहन जागतिक समुदायाला केले आहे. तर दुसरीकडे बंडखोर नेत्या ऑंग सॅन सू की यांच्या अटकेपासून म्यानमारमध्ये निषेध सुरूच आहे.









