मुंबई – सायबर क्राईममध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. नवनवीन पद्धतीने सायबर क्राईम होत असल्याचे समोर आले आहे. गेल्या महिन्यात फोन पे सारख्या अँप्लिकेशनद्वारे पैसे हडपले जात असल्याचे आढळून आले होता. सध्या एक विशिष्ट प्रकारे आयडी तयार करून २००० ते ५००० रुपये मिळाल्याचा मेसेज पाठवला जात आहे. त्यासोबत दिलेल्या लिंकवर क्लिक केल्यास संबंधित व्यक्तीच्या खात्यातील पैसे हडपले जात असल्याचे उघडकीस आहे. त्यामुळे असे कोणतेही मेसेज उघडू नये असा सल्ला सायबर तज्ज्ञांनी दिला आहे.
सध्या सायबर क्राईममध्ये नवनवीन पद्धतीने पैसे हडपण्याचे प्रकार आढळून आले आहे. त्यातच आता बोनस मिळाल्याच्या नावाखाली २००० रुपये खात्यात जमा झाले असल्याचे तत्सम मेसेज पाठवले जातात. त्यासोबत एक विशिष्ट प्रकारची लिंक देखील असते. त्यावर क्लिक केल्यास खात्यातील पैसे हडपले जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. याबाबत काही जणांनी सायबर सेलकडे तक्रार केली आहे.
संबंधित व्यक्तीच्या आय पी ऍड्रेस वरून पैसे हडपले जात असल्याची शक्यता सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे असे कोणतेही मेसेज आल्यास तत्काळ सायबर सेल येथे तक्रार करावी आणि मेसेज डिलीट करावे असे मत सायबर तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.