मुंबई – मोबाईलला नेटवर्क न येण्याची समस्या आता कॉमन झाली आहे. आता तर हा प्रश्न रोजच सतावू लागला आहे. अश्यात नेटवर्कचे सिग्नल कसे वाढवावे, हा प्रश्न उपस्थित होतो. त्याचे काही मार्ग आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत…
एअरप्लेन मोडचा करा वापर
तुमच्या मोबाईलला नेटवर्क येत नसेल तर तुम्ही एअरप्लेन मोडचा वापर करा. काही सेकंद एअरप्लेन मोड एक्टीव्ह केल्यानंतर पुन्हा त्याला बंद करा. त्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये नेटवर्क आलेले असेल.
मोबाइल करा रिस्टार्ट
बरेचदा असेही होते कीवारंवार सर्च करूनही मोबाईलला नेटवर्क येत नाही. अश्यात मोबाईल रिस्टार्ट करावा. त्यानंतर मोबाईल स्वतःच नेटवर्क सर्च करायला लागेल.
मॅन्युअली नेटवर्क सर्च करा
एअरप्लेन मोडवर टाकून किंवा रिस्टार्ट करूनही नेटवर्क येत नसेल तर तुम्ही मॅन्युअली नेटवर्क सर्च करू शकता. त्यासाठी फोनच्या सेटींगमध्ये जाऊन मोबाईल नेटवर्क सिलेक्ट करा. त्यात तुम्ही नेटवर्क सर्च करू शकता.
सॉफ्टवेअर अपडेट करा
तुम्हाला मोबाईल नेटवर्कची समस्या वारंवार उद्भवत असेल तर एकदा फोनचे सॉफ्टवेअर नक्की तपासून घ्या. बरेचदा फोनमध्ये जुने सॉफ्टवेअर असल्यामुळेदेखील ही समस्या येते. त्यासाठी टेक कंपन्या सातत्याने अपडेट्स पाठवत असतात. हे अपडेट डाऊनलोड केल्यास हा प्रश्न सुटू शकतो.