नाशिक – नवचेतना स्वयंरोजगार सहाय्य समितीतर्फे दहा दिवसांचे उद्योग प्रशिक्षण प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात येत आहे. या शिबिरात यांत्रिक साहित्य दुरूस्ती प्रशिक्षण तसेच लिफ्ट रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स प्रशिक्षण देण्यात येत आहे. सर्व वयोगटातील महिला व पुरुषांकरिता हे प्रशिक्षण खुले आहे.
या प्रशिक्षणाकरिता शिक्षणाची कोणतीही अट नाही. हे प्रशिक्षण पूर्णपणे मोफत आहे. अशा प्रकारे पुन्हा प्रशिक्षण दहा दिवस चालेल. या प्रशिक्षणासाठी होतकरू, रोजगाराची गरज असलेल्या, महिला व पुरुषांना प्रवेश दिला जाईल. प्रशिक्षणात लिफ्ट विषयी माहिती, लिफ्ट करिता लागणारे तंत्रज्ञ, लिफ्ट विक्री करणाऱ्या विविध कंपन्या, लिफ्ट उभी करतानाचे तंत्रज्ञान, लिफ्ट बसवताना घ्याव्या लागणाऱ्या विविध शासकीय परवानग्या, लिफ्ट संदर्भातले सुरक्षाविषयक नियम , लिफ्ट देखभाल व दुरुस्ती चे तंत्रज्ञान, लिफ्ट दुरुस्ती करता लागणारे विविध उपकरणे यासंदर्भातील सर्व थियरी व प्रॅक्टिकल दहा दिवसात शिकवले जाईल.
कोरोनाचे सर्व शासकीय नियम पाळूनच प्रशिक्षण होईल. हे प्रशिक्षण पूर्ण केल्यावर काही काळ लिफ्ट रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्स या क्षेत्रात काम करणाऱ्या एजन्सीच्या बरोबर पुरेसा अनुभव घेतल्यावर प्रशिक्षणार्थी या क्षेत्रात स्वतंत्र व्यवसाय करू शकतील. या क्षेत्रात व्यवसायात प्रचंड संधी आहेत.
कोरोनामुळे बेरोजगार झालेल्यांना यामुळे आयुष्याची नवीन वाट सापडेल. बऱ्याच ठिकाणी स्किल लेबर नोकरी सोडून आपल्या राज्यात परत गेले आहेत. त्यांची पोकळी भरून काढता येईल. ज्यांना लिफ्ट रिपेअर ऍण्ड मेन्टेनन्सचा कोर्स करायचा आहे त्यांनी प्राचार्य प्रशांत पाटील (९५४५४५३२३३) यांच्याशी किंवा मनोज आमले (९०२८००३१११) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या उपक्रमासाठी कैलास पाटील , हेमंत धात्रक ,मिलिंद जाधव ,दिलीप भामरे,विजय बाविस्कर ,संजय लोंढे, राजेंद्र कलाल ,अजित पाटील, डॉ राजेंद्र नेहेते , डॉ भरत केळकर, नानासाहेब सोनवणे, रामदास सूर्यवंशी,रवींद्र पाटील, डॉ उल्हास कुटे ,समीर रकटे ,रवींद्र बागुल , नंदू आबा शिंदे,महेंद्र बच्छाव, सुधाकर सिसोदे ,नरेंद्र गिरासे , शरद पाटील,ऋषिणेश बागल, वीरपाल गिरासे आदींचे सहकार्य लाभत आहे.