नवी दिल्ली – भारतीय जनता पक्षाने बिहार विधानसभा निवडणुकीसह 11 राज्यांच्या पोटनिवडणुकीही मोठा विजय मिळविला आहे. बिहारमध्ये 74 जागा जिंकून त्यांचे उमेदवार विधानसभेत जात आहेत. तसेच पोट-निवडणुकीत अनेक जागा जिंकल्यानंतर जोश वाढला आहे. कोरोना संक्रमणानंतर देशात प्रथमच निवडणुका झाल्या असल्याने या विजयाचा पुढील यश मिळविण्यासाठी भाजपकडून प्रयत्न होईल.
भारतीय जनता पक्षाला जागावाटपामध्ये १२१ जागा मिळाल्या, तर त्यांनी ११ मुकेश सहनी यांचा पक्ष व्हीआयपीला आपल्या वाट्यातून जागा दिल्या. यानंतर उर्वरित 110 जागांसाठी जेडीयूने आपले उमेदवार उभे केले. या निवडणुकीचा निकाल पाहता बिहारमध्ये ११० पैकी 74 जागा भाजपाला मिळाल्या आहेत. या निवडणुकीच्या निकालांचे गणिताकडे पाहिले तर भाजपाने 67 टक्के जागा जिंकल्या आहेत. मात्र, भाजपच्या तुलनेत जेडीयूची कामगिरी चांगली नाही. आता पोटनिवडणुकीच्या वेगवेगळ्या राज्यांच्या विधानसभा जागांवर झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाने नेत्रदीपक पद्धतीने कामगिरी करत जागा जिंकल्या.
विविध राज्यातील पोटनिवडणूकीतील स्थिती अशी :
१ ) मध्य प्रदेशातील पोटनिवडणूकीमध्ये २८ पैकी कॉंग्रेसला केवळ ९ जागांवर समाधान मानावे लागले. तर 28 पैकी 19 जागा जिंकून भाजपाने राज्यात सत्ता टिकवून ठेवण्याची खात्री दिली आहे. मध्य प्रदेश विधानसभेत 230 जागा आहेत . या विजयानंतर आता भाजपकडे 226 जागा आहेत. राज्यात भाजपला 49.5 टक्के मते मिळाली आहेत, तर कॉंग्रेसकडे 40.5 टक्के मते मिळाली.
२ ) गुजरातमध्ये भाजपाने आपली लोकप्रियता कायम ठेवत पोटनिवडणुकीत आठही जागा जिंकल्या आहेत. राज्यातील कॉंग्रेसने या निवडणुकांमध्ये अत्यंत सुमार कामगिरी केली असून त्याचा एकही उमेदवार विजयी होऊ शकला नाही. राज्यातील काँग्रेस आमदारांच्या राजीनाम्यामुळे या पोटनिवडणुका घेण्यात आल्या. येथे भाजपला 55.1 टक्के आणि कॉंग्रेसला 34.3 टक्के मते मिळाली.
३ ) उत्तर प्रदेशमधील सात जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपाने सहा जागा जिंकल्या असून एक जागा समाजवादी पक्षाकडे गेली आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपाला 36.7 टक्के आणि सपाला 23.6 टक्के मते मिळाली.
४ ) ईशान्य राज्यातील मणिपूरमधील पोटनिवडणुकीत भाजपने चार आणि अपक्षांनी पोटनिवडणुकीत एक जागा जिंकली. येथे भाजपाला 40.5 टक्के मते मिळाली आहेत.
५ ) कर्नाटकमधील दोन जागांच्या पोटनिवडणुकीत सत्ताधारी भाजपने दोन्ही जागा जिंकल्या असून राज्यात भाजपला 51.7 टक्के मते मिळाली आहेत.
६ ) तेलंगणमध्ये भाजपाने एका जागेवर पोटनिवडणूक जिंकून सत्ताधारी तेलंगण राष्ट्र समितीच्या उमेदवाराचा पराभव केला आणि त्यांना 5 टक्के मते मिळाली. या विजयासह राज्यात भाजपचे दोन आमदार आहेत.
७ ) ओडिशामध्ये सत्ताधारी बीजू जनता दलाने दोन जागा जिंकल्या असून भाजपला काही खास करता आले नाही. सत्ताधारी पक्षाला येथे 52.4 टक्के मते मिळाली.
८ ) हरियाणामध्ये कॉंग्रेसने एकमेव बडोदा मतदारसंघातील पोटनिवडणुकीत योगेश्वर दत्तचा पराभव केला आहे.
९ ) नागालँड राज्यातील दोन जागांच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी लोकशाही पुरोगामी पक्षाने एक आणि अपक्ष उमेदवाराने एक जागा जिंकली.
१० ) झारखंडमधील दोन जागांवर पोटनिवडणूक झाली. तेथे कॉंग्रेसने एकावर विजय मिळविला आणि झारखंड मुक्ती मोर्चा एका जागेवर आला.
११ ) छत्तीसगडमध्येही कॉंग्रेसने केवळ एक जागा पोटनिवडणुकीत जिंकली आहे. छत्तीसगडमध्ये 1. 56 टक्के लोकांनी कॉंग्रेसला मतदान केले.