पिंपळनेर, ता. साक्री – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त पिंपळनेर शहर भाजपाच्या वतीने सेवासप्ताहनिमीत्त सेवाकार्य म्हणून ७० वृक्षांचे रोपण करण्यात आले. लाटीपाडा धरण येथे हा समारंभ झाला. याप्रसंगी अध्यक्षस्थानी जिल्हा सरचिटणीस शैलेंद्र अजगे, प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा उपाध्याक्ष प्रदिप कोठावदे, पिंपळनेर मंडळाचे अध्यक्ष मोहन सुर्यवंशी, सरचिटणीस प्रमोद गांगुर्डे, जेष्ठ सदस्य बापु मालचे, उत्तर महाराष्ट्र सोशल मिडीयाचे सहसंयोजक प्रतिक कोतकर,अध्यात्मिक आघाडीचे जिल्हाध्यक्ष विलास मोरे, चिटणीस चंद्रशेखर बाविस्कर, हेमराज दशपुते, मंडल कार्याध्यक्ष रविंद्र कोतकर, कार्यालय प्रमुख कल्पेश कोठावदे आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक मंडलाचे संघटन सरचिटणीस रामकृष्ण एखंडे यांनी केले. सूत्रसंचलन मंडल चिटणीस धनंजय घरटे यांनी केले. आभार प्रदर्शन शहराध्यक्ष नितीन कोतकर यांनी केले. यावेळी दिपक खरोटे, मोतीलाल पोतदार, देवेंद्र पाटील, जगदीश धामणे, राजेंद्र एखंडे, विलास मोरे, शाम दुसाने, डाॅ.भुषण एखंडे, संजय भिलाणे, संतोष भामरे, संजय कोठावदे, किरण शिनकर, सुरेश पाटील, प्रविण गांगुर्डे, निलेश सोनवणे, दिनेश जैन, कल्पेश नेरकर, मयुर जाधव, श्रीकांत पगारे, अतुल खैरनार, गणेश भावसार, विकास गांगुर्डे, नंदु कोठावदे, प्रशांत कोतकर आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.